म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि यहुदी लोकांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हांला ठाऊक आहे. जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चारचौघात व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही. पश्चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्यासंबंधाने यहुदी व ग्रीक ह्यांना मी साक्ष देत होतो. आता मी अंतर्यामी पवित्र आत्म्यापुढे आज्ञाधारक होऊन यरुशलेमला जात आहे. तेथे माझे काय होईल, ते माहीत नाही. केवळ इतके कळते की, तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत. ह्याविषयी पवित्र आत्मा मला प्रत्येक शहरात सावध करीत आहे. परंतु मी तर माझा प्राण कवडीमोल मानतो. माझी धाव आणि देवाच्या कृपेचे शुभवर्तमान घोषित करण्याची जी सेवा मला प्रभू येशूकडून प्राप्त झाली आहे ती मी पूर्ण करावी, एवढीच माझी इच्छा आहे.
प्रेषितांचे कार्य 20 वाचा
ऐका प्रेषितांचे कार्य 20
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांचे कार्य 20:19-24
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ