YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 19:11-20

प्रेषितांचे कार्य 19:11-20 MACLBSI

परमेश्वर पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडवीत होता. त्याने वापरलेले रुमाल किंवा त्याच्या अंगावरचे कपडे रोग्यांकडे आणले तरीदेखील त्यांचे रोग दूर होत व दुष्ट आत्मे त्यांच्यांतून निघून जात असत. काही भटके यहुदी, दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांना प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले, “ज्या येशूची पौल घोषणा करतो त्याची तुम्हांला शपथ घालतो.” एक मुख्य यहुदी याजक स्किवा ह्याला सात मुलगे होते, ते असे करत होते. त्यांना दुष्ट आत्म्याने उत्तर दिले, “येशूला मी ओळखतो व पौलाची मला माहिती आहे, पण तुम्ही कोण आहात?” ज्या माणसाला दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी घालून त्या सर्वांना हटविले आणि त्यांना इतका मार दिला की, ते घायाळ होऊन उघडे-नागडे त्या घरातून पळून गेले. इफिस येथे राहणारे यहुदी व ग्रीक ह्या सर्वांना हे कळले, तेव्हा ते भयभीत झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा वाढला. विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली पापे उघडपणे पदरात घेतली. जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत ती जाळून टाकली आणि त्यांच्या किंमतीची बेरीज केली तेव्हा ती पन्नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी झाली. ह्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याने वचन पसरत जाऊन प्रबल झाले.

प्रेषितांचे कार्य 19:11-20 साठी चलचित्र