YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 18:24-28

प्रेषितांचे कार्य 18:24-28 MACLBSI

आलेक्सांद्रिया येथे जन्मलेला अपुल्‍लो नावाचा महान वक्ता व धर्मशास्त्रपारंगत असलेला एक यहुदी मनुष्य इफिस येथे आला. त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते. तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी उचित प्रकारे सांगून शिकवण देत असे, तरी त्याला केवळ योहानचा बाप्तिस्मा ठाऊक होता. तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्‍ला व अक्‍विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला त्यांच्या घरी बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला. नंतर त्याने अखया प्रांतात जाण्याचा बेत केला. बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी तेथल्या शिष्यांना लिहिले. तो तेथे पोहचल्यावर ज्यांनी प्रभूच्या कृपेमुळे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार साहाय्य केले; कारण येशू हाच ख्रिस्त आहे, असे धर्मशास्त्रामधून दाखवून तो अत्यंत प्रभावीपणे सर्वांसमक्ष यहुदी लोकांचे म्हणणे खोडून काढीत असे.

प्रेषितांचे कार्य 18:24-28 साठी चलचित्र