मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता इतर बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी भयंकर भूकंप झाला आणि तुरुंगाचा पाया डगमगला. सर्व दरवाजे तत्काळ उघडले व सर्वांच्या बेड्या तुटल्या. तुरुंगाच्या अधिकाऱ्याने जागे होऊन जेव्हा तुरुंगाचे दरवाजे उघडे पाहिले, तेव्हा बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून स्वतःचा घात करण्याच्या बेतात होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, “तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस! आम्ही सर्व जण येथेच आहोत.” दिवे मागवून तो तुरुंगाधिकारी आत धावत गेला; कापत कापत पौल व सीला यांच्या पाया पडला आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, “महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे?” त्यांनी उत्तर दिले, “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” नंतर त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला. त्यानंतर त्याने त्यांना घरी नेऊन जेवू घातले. त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळींनी आपण आता देवावर श्रद्धा ठेवत आहोत म्हणून आनंदोत्सव केला.
प्रेषितांचे कार्य 16 वाचा
ऐका प्रेषितांचे कार्य 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांचे कार्य 16:25-34
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ