पौलने जे केले ते पाहून लोकसमुदाय लुकवनी भाषेत ओरडून बोलले, “देव माणसाच्या रूपाने आपल्यामध्ये उतरले आहेत.” त्यांनी बर्णबाला ज्यूपिटर म्हटले व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटले. नगरापुढे असलेल्या ज्यूपिटरच्या याजकाने बैल व फुले प्रवेशद्वाराजवळ आणली. लोकांना बरोबर घेऊन बलिदान करावे, असे त्याच्या मनात होते. हे ऐकून बर्णबा व पौल ह्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून ओरडून म्हटले, “गृहस्थांनो, हे का करता? आम्ही व तुम्ही मर्त्य माणसे आहोत, तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले. त्या जिवंत देवाकडे वळावे, असे शुभवर्तमान आम्ही तुम्हांला सांगतो.
प्रेषितांचे कार्य 14 वाचा
ऐका प्रेषितांचे कार्य 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांचे कार्य 14:11-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ