मरण सोसल्यानंतरही त्याने चाळीस दिवस त्यांना दर्शन देऊन अनेक ठोस पुराव्यांनिशी आपण जिवंत आहोत, हे दाखवले. त्यांनी त्याला पाहिले व त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयी सांगितले. ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आदेश दिला, “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने दिलेल्या ज्या वचनाविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे, त्याची वाट पाहा. योहानने पाण्याने बाप्तिस्मा दिला, पण तुम्हाला थोड्या दिवसांत पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देण्यात येईल.” प्रेषित येशूबरोबर एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, “प्रभो, तुम्ही इस्राएलचे राज्य पुन्हा स्थापन करणार त्याची वेळ हीच आहे का?” तो त्यांना म्हणाला, “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत, ते तुम्हांला जाणून घेता येणार नाही. परंतु तुमच्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक झाल्यावर तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेममध्ये, सर्व यहुदियात, शोमरोनात व जगभर तुम्ही माझे साक्षीदार व्हाल.” असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. तो जात असता, ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा त्यांनी शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष अचानक त्यांच्याजवळ उभे राहिलेले पाहिले आणि ते म्हणाले, “अहो गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत उभे का राहिला आहात? हा येशू जो तुमच्यापासून वर स्वर्गात घेतला गेला तो, तुम्ही त्याला जसे वर जाताना पाहिले, तसाच पुन्हा येईल.”
प्रेषितांचे कार्य 1 वाचा
ऐका प्रेषितांचे कार्य 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांचे कार्य 1:3-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ