YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 करिंथ 5:1-10

2 करिंथ 5:1-10 MACLBSI

आम्हांला ठाऊक आहे की, जरी आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी घर म्हणजेच आमचे शरीर मोडून टाकण्यात आले, तरी देवाने आमच्यासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हातांनी बांधलेले घर नसून शाश्वत घर आहे. ह्या घरात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूपी वस्त्र परिधान करण्यासाठी आतूर होतो. आम्ही अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो तर, आम्ही शरीराविना सापडणार नाही. जे आम्ही ह्या मंडपात आहोत, ते आम्ही भाराक्रांत होऊन कण्हतो. आमच्या ऐहिक शरीराचा त्याग करावा अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर स्वर्गीय वस्त्र परिधान करावे अशी इच्छा आम्ही बाळगतो, ह्यासाठी की, जे मर्त्य आहे, ते जीवनाच्यायोगे संजीवित व्हावे. देवाने आम्हांला ह्याकरिताच सिद्ध केले आहे आणि त्याने त्याचा आत्मा हमी म्हणून दिला आहे. ह्यामुळे आम्ही सर्वदा धैर्य धरतो, आणि हे लक्षात ठेवतो की, आम्ही शरीरात वसती करीत आहोत तोवर आम्ही प्रभूपासून दूर आलेले असे आहोत; कारण आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरतो आणि शरीराचा त्याग करून प्रभूबरोबर राहणे आम्ही पसंत करू.. आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेले असलो, तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हांला हौस आहे. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपात प्रकट व्हावे लागते. प्रत्येकाने देहाने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कृत्यांचे फळ त्याला ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर मिळावे.