ते अब्राहामचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे! (हे मी वेडगळासारखे बोलतो). मी अधिक कठोर परिश्रम केले आहेत. मी अधिक वेळा तुरुंगवास भोगला आहे. मी अगणित फटके खाल्ले आहेत. मी पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत सापडलो होतो - या सर्वांमुळे मी अधिक प्रमाणात ख्रिस्ताचा सेवक आहे. पाच वेळा मी यहुदी लोकांच्या हातून चाबकाचे एकोणचाळीस फटके खाल्ले. तीन वेळा रोमन लोकांकडून छड्यांचा मार खाल्ला. एकदा माझ्यावर दगडफेक झाली. तीन वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालविली. मी किती तरी प्रवास केला. पुरांमुळे आलेली संकटे, लुटांरूमुळे आलेली संकटे, माझ्या यहुदी देशबांधवांनी आणलेली संकटे, यहुदीतरांनी आणलेली संकटे; श्रम व कष्ट, किती तरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, अन्नवस्र व निवारा याविना काढलेले दिवस ह्या सर्वांमुळे मी अधिक प्रमाणात ख्रिस्ताचा सेवक आहे. शिवाय ह्या व अशा इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे ओझे, म्हणजे सर्व ख्रिस्तमंडळ्यांविषयी चिंता, ही आहे.
2 करिंथ 11 वाचा
ऐका 2 करिंथ 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 करिंथ 11:23-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ