माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो सजीव दगड त्याच्याजवळ येत असता, तुम्हीही स्वतः सजीव दगडासारखे आध्यात्मिक मंदिर म्हणून रचले जात आहात, ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताद्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. असा धर्मशास्त्रलेख आहे: पाहा, निवडलेली मूल्यवान अशी कोनशिला मी सीयोनमध्ये बसवितो, तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्याची फजिती होणार नाही. म्हणून तुम्हां विश्वास ठेवणाऱ्यांना ती मूल्यवान आहे, परंतु जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना, बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड तोच कोनशिला झाला. तसेच दुसरा धर्मशास्त्रलेख म्हणतो, हाच दगड ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक झाला. ते वचन मानीत नसल्यामुळे ठेचकाळतात. हीच त्यांच्यासाठी देवाची इच्छा होती. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजेशाही याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही जाहीर करावेत. तुम्ही पूर्वी देवाचे लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. पूर्वी तुमच्यावर दया झाली नव्हती, आता तर दया झाली आहे.
1 पेत्र 2 वाचा
ऐका 1 पेत्र 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 पेत्र 2:4-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ