YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिंथ 14:4-6

1 करिंथ 14:4-6 MACLBSI

अपरिचित भाषा बोलणारा स्वतःलाच साहाय्य करतो, संदेष्टा ख्रिस्तमंडळीला साहाय्य करतो. तुम्ही सर्वांनी अपरिचित भाषा बोलाव्यात, अशी माझी इच्छा आहे. परंतु विशेषत: तुम्ही संदेश द्यावा, अशी माझी मनीषा आहे; कारण ख्रिस्तमंडळीच्या उन्नतीकरिता अपरिचित भाषांचा अर्थ सांगणारा नसेल, तर जो अपरिचित भाषा बोलतो, त्याच्यापेक्षा देवाचा संदेष्टा श्रेष्ठ आहे. तर आता बंधुजनहो, मी तुमच्याकडे येऊन अपरिचित भाषांमध्ये बोललो पण प्रकटीकरण, विद्या, संदेश किंवा शिक्षण ह्यांच्याद्वारे जर तुमच्याबरोबर बोललो नाही, तर मी तुमचे काय हित साधणार?