बंधुजनहो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तुम्ही यहुदीतर होता तेव्हा जसे वळण तुम्हांला लावण्यात येत होते, तसे तुम्ही त्या निर्जीव मूर्तींकडे बहकले जात होता, हे तुम्हांला ठाऊक आहे. म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही, “येशू शापभ्रष्ट आहे”, असे म्हणू शकत नाही आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्यावाचून कोणालाही “येशू प्रभू आहे”, असे म्हणता येत नाही. कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु एकच पवित्र आत्मा ती दाने देत असतो.
1 करिंथ 12 वाचा
ऐका 1 करिंथ 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 करिंथ 12:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ