तर मग ज्ञानी कोठे राहिले? धर्मशास्त्र कोठे राहिले? ह्या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले आहे! जगाला स्वतःच्या शहाणपणाद्वारे देवाची ओळख पटली नाही. आम्ही केलेली घोषण़ा जगाला मूर्खपणाची वाटली. म्हणून देवाने त्याच्या शहाणपणानुसार ठरवले की, ह्या घोषणेवर जे श्रद्धा ठेवतात त्यांचे तारण व्हावे. यहुदी लोक चमत्कारांचा पुरावा मागतात व ग्रीक ज्ञानाचा शोध करतात, परंतु आम्ही तर क्रुसावर चढवलेला ख्रिस्त जाहीर करतो. हा संदेश यहुदी लोकांना न आवडणारा व ग्रीक लोकांना मूर्खपणा वाटेल असा आहे खरा, मात्र पाचारण झालेल्या यहुदी व ग्रीक अशा दोघांनाही तो संदेश म्हणजे स्वतः ख्रिस्त आहे, तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे. कारण देवाचा मूर्खपणा, माणसांच्या शहाणपणापेक्षा अधिक सुज्ञ आहे आणि देवाची दुर्बलता माणसांच्या शक्तीपेक्षा अधिक बळकट आहे. तर बंधुजनहो, तुम्हांला झालेल्या पाचारणाचा विचार करा. तुमच्यामध्ये पुष्कळ जण जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे नाहीत. तरी ज्ञानी लोकांना लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्ख ते निवडले आणि बलवानांना लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बल ते निवडले आणि जगातील ज्या क्षुल्लक, तिरस्करणीय व नगण्य गोष्टी देवाने ह्याच्यासाठी निवडल्या की, जे अस्तित्वात आहे ते त्याने शून्यवत करावे, म्हणजे देवासमोर कोणीही बढाई मारू नये. तो आपल्यासाठी देवाचे ज्ञान, नीतिमत्त्व, पवित्रीकरण आणि तारण झाला आहे. देवामुळे तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. म्हणजे ‘जो अभिमान बाळगतो, त्याने प्रभूविषयी तो बाळगावा’ ह्या धर्मशास्त्रलेखाप्रमाणे व्हावे.
1 करिंथ 1 वाचा
ऐका 1 करिंथ 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 करिंथ 1:20-31
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ