YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिंथ 1:20-25

1 करिंथ 1:20-25 MACLBSI

तर मग ज्ञानी कोठे राहिले? धर्मशास्त्र कोठे राहिले? ह्या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले आहे! जगाला स्वतःच्या शहाणपणाद्वारे देवाची ओळख पटली नाही. आम्ही केलेली घोषण़ा जगाला मूर्खपणाची वाटली. म्हणून देवाने त्याच्या शहाणपणानुसार ठरवले की, ह्या घोषणेवर जे श्रद्धा ठेवतात त्यांचे तारण व्हावे. यहुदी लोक चमत्कारांचा पुरावा मागतात व ग्रीक ज्ञानाचा शोध करतात, परंतु आम्ही तर क्रुसावर चढवलेला ख्रिस्त जाहीर करतो. हा संदेश यहुदी लोकांना न आवडणारा व ग्रीक लोकांना मूर्खपणा वाटेल असा आहे खरा, मात्र पाचारण झालेल्या यहुदी व ग्रीक अशा दोघांनाही तो संदेश म्हणजे स्वतः ख्रिस्त आहे, तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे. कारण देवाचा मूर्खपणा, माणसांच्या शहाणपणापेक्षा अधिक सुज्ञ आहे आणि देवाची दुर्बलता माणसांच्या शक्तीपेक्षा अधिक बळकट आहे.