YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रक. 1:1-7

प्रक. 1:1-7 IRVMAR

हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. ते देवाने ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहेत, त्या आपल्या दासांना दाखविण्यासाठी ख्रिस्ताला दिले, आणि ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला कळविण्यास सांगितले. योहानाने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्या सर्वांविषयी साक्ष दिली; या संदेशाची वचने वाचणारे, ती ऐकणारे व त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते धन्य आहेत कारण काळ जवळ आला आहे. योहानाकडून, आशिया प्रांतातील सात मंडळ्यांना जो आहे, जो होता व जो येणार आहे त्याच्याकडून आणि त्याच्या राजासनासमोरील सात आत्म्यांकडून तुम्हास कृपा व शांती असो. आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी जो मरण पावलेल्यांमधून प्रथम जन्मलेला आणि पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती आहे आणि ज्या येशूने आमच्यावर प्रीती केली आणि ज्याने आपल्या रक्ताने आमच्या पापांतून आम्हास मुक्त केले; ज्याने आम्हास त्याच्या देवपित्यासाठी एक राज्य आणि याजक बनविले त्यास गौरव व सामर्थ्य युगानुयुग असोत, आमेन. “पहा, तो ढगांसह येत आहे,” “प्रत्येक डोळा त्यास पाहील, ज्यांनी त्यास भोकसले तेसुध्दा त्यास पाहतील,” पृथ्वीवरील सर्व वंश “त्याच्यामुळे आकांत करतील.” असेच होईल, आमेन.