YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 60

60
शत्रूला विरोध करण्यासाठी साहाय्याची याचना
स्तोत्र. 108:6-13
दाविदाचे स्तोत्र
1हे देवा, तू आम्हास टाकून दिले आहेस; तू आम्हास फाडून खाली टाकले आहे; आमच्यावर रागावला आहेस;
तू आम्हांस पुन्हा पूर्वस्थितीवर आण.
2तू भूमी कंपित केली आहेस; तू ती फाडून वेगळी केली; तिचे खिंडार बरे कर,
कारण ती हादरत आहे.
3तू तुझ्या लोकांस कठीण गोष्टी दाखवल्या आहेत;
तू आम्हास झिंगवण्यास लावणारा द्राक्षरस पाजला आहे.
4तुझा आदर करणाऱ्यास तू निशाण दिले आहे,
यासाठी की, त्यांनी सत्याकरता तो उभारावा.
5ज्यांच्यावर तू प्रेम करतो त्यांची सुटका व्हावी,
म्हणून तुझ्या उजव्या हाताने आमची सुटका कर आणि आम्हास उत्तर दे.
6देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी जल्लोष करीन;
मी शखेमाची वाटणी करीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.
7गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे;
एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे;
यहूदा माझा राजदंड आहे.
8मवाब माझे धुण्याचे पात्र आहे;
अदोमावर मी माझे पादत्राण फेकीन;
मी आनंदाने पलिष्ट्यावर विजयाने आरोळी मारीन.
9मला बळकट नगरात कोण नेईल?
मला अदोमात कोण नेईल?
10हे देवा, तू आम्हास नाकारले नाही?
परंतु तू आमच्या सैन्याबरोबर लढाईत गेला नाहीस.
11तू आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत कर,
कारण मनुष्याचे सहाय्य निष्फळ आहे.
12आम्ही देवाच्या मदतीने विजयी होऊ;
तो आमच्या शत्रूला आपल्या पायाखाली तुडविल.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 60: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन