YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 47

47
देव अखिल पृथ्वीचा राजा
कोरहाच्या पुत्राचे स्तोत्रगीते
1अहो सर्व लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा.
विजयोत्सवाने देवाचा जयजयकार करा.
2कारण परात्पर परमेश्वर भय धरण्यास योग्य आहे;
तो सर्व पृथ्वीवर थोर राजा आहे.
3तो लोकांस आमच्या ताब्यात देतो,
आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणतो.
4त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे,
ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे.
5जयघोष होत असता देव वर गेला,
परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला.
6देवाला स्तुतिगान गा, स्तुतिस्तवने गा;
आमच्या राजाची स्तुतिगीते गा, स्तुतिगीते गा.
7कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे;
त्याची स्तुतीपर गाणे उमजून गा.
8देव राष्ट्रांवर राज्य करतो;
देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे.
9अब्राहामाच्या देवाच्या लोकांचे अधिपती एकत्र जमले आहेत;
कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत.
तो अत्यंत उंच आहे.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 47: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन