YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 29

29
तुफानात परमेश्वराची वाणी
दाविदाचे स्तोत्र.
1स्वर्गदूतहो, परमेश्वरास गौरव
आणि सामर्थ्य आहे असे कबूल करा.
2परमेश्वरास त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या;
पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
3परमेश्वराचा आवाज जलांवरून ऐकण्यात आला,
गौरवशाली देव गर्जत आहे,
परमेश्वर पुष्कळ जलांवर गर्जत आहे.
4परमेश्वराचा आवाज सामर्थशाली आहे,
परमेश्वराचा आवाज चमत्कारीक आहे.
5परमेश्वराची वाणी देवदार वृक्षाला तोडते,
परमेश्वर लबानोनाच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
6तो लबानोनला वासराप्रमाणे आणि
सिर्योनला तरुण बैलाप्रमाणे बागडायला लावतो.
7परमेश्वराची वाणी अग्नी ज्वालासह हल्ला करते.
8परमेश्वराची वाणी वाळवंटाला कंपित करते
कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या वाणीने हादरते.
9परमेश्वराची वाणी हरणाला प्रसवयास लावते
आणि अरण्य पर्णहीन करते.
पण त्याच्या मंदिरात सर्व “महिमा!” गातात
10महापुरावर परमेश्वर राजा बसला आहे,
आणि परमेश्वरच सर्वकाळचा राजा म्हणून बसला आहे.
11परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्य देतो,
परमेश्वर त्याच्या लोकांना शांतीने आशीर्वादित करतो.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 29: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन