नंतर त्यानीं फलदायी देश तुच्छ मानला; त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला नाही, पण आपल्या तंबूत त्यांनी कुरकुर केली, आणि परमेश्वराचा शब्द मानिला नाही. म्हणून त्याने त्यांच्याविषयी शपथ वाहिली की, मी त्यांना रानात मरू देईन. त्यांचे वंशज राष्ट्रामध्ये विखरीन, आणि त्यांना परक्या राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन. त्यांनी बआल-पौराची पूजा केली, आणि मरण पावलेल्यांना अर्पण केलेले बली त्यांनी खाल्ले. त्यांनी त्यांच्या कृतीने त्यास कोपविले, आणि त्यांच्यात मरी पसरली. पण फिनहास मध्यस्थी उठला; आणि मरी बंद झाली. हे त्यास नितीमत्व असे सर्व पिढ्यानपिढ्या सर्वकाळ गणण्यात आले. त्यांनी मरीबा येथील जलाजवळही त्यास संताप आणला, आणि त्यांमुळे मोशेला दुःख सोसावे लागले. त्यांनी त्याच्यात कडवटपणा आणला, आणि तो अविचाराने बोलला. परमेश्वराने त्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी राष्ट्रांचा नाश केला नाही. पण ते अन्यजाती लोकांच्या राष्ट्रात मिसळले, व त्यांचे मार्ग शिकले.
स्तोत्र. 106 वाचा
ऐका स्तोत्र. 106
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्र. 106:24-35
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ