YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीति. 7

7
व्याभिचारिणीच्या कारवाया
1माझ्या मुला, माझे शब्द जपून ठेव,
आणि माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव.
2माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत रहा,
आणि माझे शिक्षण डोळ्यातील बाहुलीप्रमाणे जप.
3ती आपल्या बोटांस बांध;
ती आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव.
4“तू माझी बहीण आहेस” असे ज्ञानाला म्हण,
आणि सुज्ञतेला आपले नातेवाईक म्हण,
5अशासाठी की, भुरळ घालणाऱ्या स्त्रीपासून,
ते तुला व्यभिचारी स्त्रीच्या गोड शब्दांपासून वाचवतील.
6माझ्या घराच्या खिडकीजवळील
जाळ्यातून मी बाहेर पाहिले;
7आणि मी पुष्कळ भोळे तरुण पाहिले.
मला तरुणांमध्ये एक तरुण दिसला,
जो बुद्धिहीन मनुष्य होता.
8तो तरुण मनुष्य तिच्या कोपऱ्याजवळून जाणाऱ्या वाटेने जात होता,
आणि तो तिच्या घराकडे,
9त्या दिवशी संध्याकाळी संधीप्रकाशात,
रात्रीच्यावेळी आणि अंधकारात गेला.
10आणि तेथे ती स्त्री त्यास भेटली,
वेश्येसारखा पोशाख केलेली आणि ती तेथे कशासाठी आहे हे तिला माहित होते.
11ती वाचाळ व स्वच्छंदी असून,
तिचे पाय घरी राहत नाही;
12कधी रस्त्यात, कधी बाजारात,
प्रत्येक नाक्याजवळ ती थांबून राहते.
13मग तिने त्यास धरले आणि त्याची चुंबने घेतली;
निर्लज्जपणे ती त्यास म्हणाली,
14“आज मी माझी शांत्यर्पणे केली;
मी आपले नवस फेडले,
15ह्यासाठी मी तुला भेटायला,
तुझे मुख पाहायला उत्सुकतेने बाहेर आले आणि तू मला सापडला आहेस.
16मी आपल्या अंथरुणावर,
मिसरातली रंगीत सुती चादर पसरली आहे.
17मी आपले अंथरुण
बोळ, अगरू, दालचिनी यांनी सुवासिक केली आहे.
18ये, आपण सकाळपर्यंत प्रीतीने भरून तृप्त होऊ;
आपण वेगवेगळ्या कृतींनी प्रेम करून महान आनंद घेऊ.
19माझा पती घरी नाही;
तो लांबच्या प्रवासास गेला आहे.
20त्याने प्रवासासाठी पैश्याची पिशवीबरोबर घेतली आहे;
तो पौर्णिमेच्या दिवशी परत घरी येईल.”
21तिने आपल्या मोहक बोलण्याने त्याचे मन वळवले;
आणि आपल्या गोड बोलण्याने तिने त्यास सक्ती केली.
22तो तिच्यामागे चालला,
जसा बैल कापला जाण्यास जातो,
किंवा जसा हरीण सापळ्यात पकडला जातो,
23जसा पक्षी, पाशाकडे धाव घेतो,
तसा हे आपल्या जीवाची किंमत घेण्यासाठी आहे हे तो जाणत नाही,
किंवा तिर त्याचे काळीज भेदून जाईपर्यंत तसा तो तिच्यामागे जातो.
24आणि आता, माझ्या मुलांनो, माझे ऐका;
मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या.
25तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नकोस;
तिच्या वाटांनी जाऊन बहकू नकोस.
26कारण तिने पुष्कळांना घायाळ करून पाडले आहे,
त्यांची संख्या मोजू शकत नाही.
27तिचे घर म्हणजे अधोलोकाकडचा मार्ग आहे;
तो मृत्यूच्या खोल्यांकडे खाली उतरून जातो.

सध्या निवडलेले:

नीति. 7: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन