YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीति. 24:23-34

नीति. 24:23-34 IRVMAR

हेही शहाण्या मनुष्याचे शब्द आहेत. न्यायात पक्षपात करणे चांगले नाही. जो कोणी अपराधी मनुष्यास म्हणेल, तू योग्य आहेस; तर लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्यांचा द्वेष करतील. पण जो कोणी दुर्जनाचा निषेध करतो त्यास आनंद होईल, आणि त्यांच्यावर उत्तम आशीर्वाद येईल. जो कोणी प्रामाणिकपणे उत्तर देतो तो ओठांचे चुंबन देतो. तू आपले बाहेरचे काम आधी कर, आणि शेतात प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी सज्ज कर, आणि मग आपले घर बांध. निष्कारण आपल्या शेजाऱ्याविरूद्ध साक्ष देऊ नको, आणि आपल्या वाणीने फसवू नको. “त्याने जसे मला केले तसे मी त्यास करीन. मी त्यास त्याच्या करण्याप्रमाणे भरून देईन.” असे म्हणू नको. मी आळशी मनुष्याच्या शेताजवळून, मी बुद्धिहीन मनुष्याच्या द्राक्षाच्या मळ्याजवळून जात होतो. तेव्हा त्या सर्वांवर काटेरी झाडे वाढली होती, त्याची जमीन खाजकुइरीने झाकली होती, आणि त्याची दगडी भिंत मोडून पडली होती. मी ते बघितले आणि त्याचा विचार करू लागलो. व नंतर त्या गोष्टींपासून मी धडा शिकलो. “थोडीशी झोप घेतो, थोड्याशा डुलक्या घेतो, थोडीशी विश्रांती घ्यायला हात पोटाशी धरतो.” आणि दारिद्र्य लुटारूसारखे, आणि तुझी गरज तुझ्यावर हत्यारबंद सैन्यासारखी येईल.