YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गण. 6:1-12

गण. 6:1-12 IRVMAR

परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, इस्राएल लोकांशी बोल. त्यांना सांग, जेव्हा कोणी पुरुष किंवा स्त्री आपणास परमेश्वरासाठी वेगळे होऊन नाजीराचा विशेष नवस करील, त्याने मद्य किंवा मादक द्रव्यापासून दूर रहावे. त्याने मद्यापासून केलेला शिरका किंवा मादक पेय पिऊ नये. त्याने द्राक्षाचा कसलाही रस पिऊ नये किंवा ताजी द्राक्षे किंवा मनुकेही खाऊ नयेत. तो माझ्यासाठी वेगळा झाला त्या सर्व दिवसात, त्याने द्राक्षापासून केलेली प्रत्येक गोष्ट, जी बियापासून ते सालपटापर्यंत समाविष्ट आहे काहीच खाऊ नये. त्याने परमेश्वरासाठी वेगळे राहण्याचा कालावधी पूर्ण होईपर्यंत त्याच्या नवसाच्या दिवसापर्यंत त्याच्या डोक्यावर वस्तऱ्याचा उपयोग करू नये. तो देवासाठी वेगळा केला आहे. त्याने आपल्या डोक्याचे केस लांब वाढू द्यावेत. त्याने आपल्या स्वतःला परमेश्वरासाठी वेगळे केलेल्या सर्व दिवसात, त्याने प्रेताजवळ जाऊ नये. त्याच्या स्वत:चा बाप, आई, भाऊ किंवा बहीण जर कोणी मरण पावले तर त्यांच्याकरिता अशुद्ध होऊ नये. कारण तो देवासाठी वेगळा केलेला आहे, जसे प्रत्येकजण त्याच्या डोक्यावरील लांब केस पाहतील. आपल्या वेगळे राहण्याच्या सर्व दिवसात तो परमेश्वरासाठी पवित्र, राखीव आहे. जर कोणी अचानक त्याच्याजवळ मरण पावला आणि त्याने वेगळा केलेला मनुष्य अशुद्ध झाला, तर त्याने आपल्या शुद्धीकरण्याच्या दिवशी डोक्याचे मुंडण करावे, म्हणजे ते सातव्या दिवसानंतर करावे. तेव्हा त्याने आपले डोके मुंडावे. आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी याजकाकडे आणावीत. मग याजकाने एक पक्षी पापार्पण व दुसऱ्याचा होमार्पण करावा. हे त्याच्यासाठी प्रायश्चित आहे कारण प्रेताजवळ जाऊन त्याने पाप केले. त्याने त्याच दिवशी आपल्या स्वतःला पुन्हा पवित्र करावे. त्याने परमेश्वरासाठी वेगळे होण्यासाठी स्वत:ला पुन्हा समर्पित करावे. त्याने एक वर्षाचा मेंढा दोषार्पणासाठी आणावा. त्याने आपल्याला अशुद्ध करून घेण्याच्या पूर्वीचे दिवस मोजू नयेत. कारण तो देवासाठी वेगळा झाला तेव्हा तो अशुद्ध झाला होता.

गण. 6 वाचा

ऐका गण. 6