YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्त. 6:9-18

मत्त. 6:9-18 IRVMAR

म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आमच्या ऋण्यांस त्यांची ऋणे सोडली आहेत, तशीच तू आमची ऋणे आम्हांस सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.) कारण जर तुम्ही इतरांचे अपराध क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हासही क्षमा करील; पण जर तुम्ही इतरांच्या अपराधांची क्षमा करणार नाही, तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्ही ढोंगी लोकांसारखे उदास चेहऱ्याचे राहू नका कारण आपण उपवास करीत आहोत हे लोकांस दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हास खरे सांगतो त्यांना त्यांचे प्रतिफळ प्राप्त झाले आहे. तू जेव्हा उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तू तेल लाव आणि आपले तोंड धुवा. यासाठी की, तू उपवास करता हे लोकांस दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हास उघडपणे प्रतिफळ देईल.