त्याने आपले बाण माझ्या अंतःकरणात घुसवले आहेत. माझ्या स्वजनामध्येच मी चेष्टेचा विषय; प्रतिदिवशी त्यांचे हास्यास्पद गीत झालो आहे. त्याने मला कडूपणाने भरले आहे, त्याने मला कडू दवणा प्यायला भाग पाडले आहे. त्याने खड्यांनी माझे दात तोडले आहेत. त्याने मला राखेत लोटले आहे. माझ्या जीवनातील शांतीच तू काढून टाकली आहेस; कोणत्याही आनंदाचे मला स्मरण होत नाही. मी म्हणालो, “माझे बल आणि परमेश्वरावरची माझी आशा नष्ट झाली आहे.” माझे दुःख, कष्ट, कडू दवणा आणि विष ह्याचे स्मरण कर. मला माझ्या सर्व त्रासांची आठवण आहे. म्हणूनच मी माझ्यामध्ये नमलो आहे. पण हे मी माझ्या मनात विचार करतो म्हणून मला आशा वाटते. ही परमेश्वराची प्रेमदया आहे की आम्ही नाश नाही झालो. त्याची करुणा कधी न संपणारी आहे. ती प्रत्येक दिवशी नवीन होते; तुझे विश्वासूपण महान आहे. माझा जीव म्हणतो, “परमेश्वर माझा वतनभाग आहे. म्हणूनच मी त्याच्यावर आशा ठेवीन.” जे परमेश्वराची वाट पाहतात व जो जीव त्यास शोधतो, त्याला परमेश्वर चांगला आहे. परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची मुकाट्याने वाट पाहणे हे चांगले आहे. पुरूषाने आपल्या तरूणपणांत जू वाहावे हे त्यास फार चांगले आहे.
विला. 3 वाचा
ऐका विला. 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: विला. 3:13-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ