YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 4:4-10

शास्ते 4:4-10 IRVMAR

त्या वेळी लप्पिदोथाची पत्नी दबोरा भविष्यवादीण ही इस्राएलाचा न्यायनिवाडा करीत होती. एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल यांच्या दरम्यान दबोराच्या खजुरीच्या झाडाखाली तिची बैठक असे; इस्राएल लोक तिच्याकडे त्यांचा वाद सोडवण्यास येत असत. तिने अबीनवामाचा पुत्र बाराक ह्याला नफताली लोकांच्या केदेश प्रदेशातून बोलावणे पाठवून म्हटले, “तू नफताली व जबुलून ह्यांच्यातले दहा हजार पुरुष आपणाबरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे जा अशी आज्ञा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे. तो म्हणतो, याबीनाचा सेनापती सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे किशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन, आणि त्यास तुझ्या हाती देईन.” बाराक तिला म्हणाला, “तू माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, पण तू माझ्याबरोबर येणार नसलीस तर मी जाणार नाही.” ती म्हणाली, “मी तुझ्याबरोबर अवश्य येईन, पण ज्या मार्गाने तू जाणार आहेस त्यामध्ये तुझा सन्मान होणार नाही, कारण परमेश्वर सीसरा ह्याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे.” मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेली. बाराकाने जबुलून व नफताली येथील पुरुषांना केदेश येथे एकत्रित बोलावले; मग त्याच्या मागोमाग दहा हजार पुरुष निघाले आणि दबोराही त्याच्याबरोबर गेली.