नंतर शमशोन खाली तिम्ना नगरात गेला, आणि त्याने तिम्नामध्ये पलिष्ट्यांच्या मुलींमध्ये एक स्त्री पाहिली. तो जेव्हा माघारी आला तेव्हा त्याने आपल्या बापाला व आईला ह्याविषयी सांगितले, “मी तिम्नात पलिष्ट्यांची एक मुलगी पाहिली आहे; तर आता तुम्ही ती मला पत्नी करून द्या.” परंतु त्याचे आई व बाप त्यास म्हणाले, “तुझ्या नातेवाईकांत किंवा तुझ्या लोकांमध्ये कोणी मुली नाहीत काय, म्हणून तू बेसुंती पलिष्ट्यांतली पत्नी करून घ्यायला जात आहेस?” तथापि शमशोन आपल्या बापाला म्हणाला, “तीच मजसाठी मिळवून द्या; कारण जेव्हा मी तिच्याकडे बघितले तेव्हाच मला ती पसंत पडली आहे.” परंतु ही तर परमेश्वराची इच्छा होती की पलिष्ट्यांबरोबर परस्पर विरोध व्हावा, त्याच्या आई आणि बापाला हे समजले नव्हते; कारण त्या वेळेस पलिष्टी इस्राएलावर राज्य करत होते.
शास्ते 14 वाचा
ऐका शास्ते 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: शास्ते 14:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ