उज्जीया राजा मरण पावला त्या वर्षी मी प्रभूला सिहांसनावर बसलेले पाहीले; तो उंच आणि उंच चढविलेला होता; आणि त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदीर भरून गेले होते. त्याच्याबाजूला सराफीम होते; प्रत्येकाला सहा पंख होते; दोहोंनी प्रत्येकजण आपला चेहरा झाकीत; आणि दोहोंनी आपले पाय झाकी; आणि दोहोंनी उडे. प्रत्येकजण दुसऱ्याला हाक मारीत आणि म्हणत, “पवित्र, पवित्र, पवित्र, सेनाधीश परमेश्वर! त्याच्या गौरवाने सर्व पृथ्वी भरून गेली आहे.” जे कोणी घोषणा करीत होते त्यांच्या वाणीने दरवाजे व उंबरठे हादरले, आणि मंदिर धुराने भरून गेले. तेव्हा मी म्हणालो, “मला हाय हाय आहे! कारण मी आता मरणार आहे. कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे, आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो, कारण माझ्या डोळ्यांनी राजाला, परमेश्वरास, सेनाधीश परमेश्वरास पाहीले आहे.” मग सराफीमामधील एक माझ्याकडे उडत आला; त्याच्या हातात एक धगधगीत इंगळ होता, तो त्याने एका चिमट्याने वेदीवरुन उचलला होता.
यश. 6 वाचा
ऐका यश. 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यश. 6:1-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ