यश. 40:6-8
यश. 40:6-8 IRVMAR
एक वाणी म्हणाली, “घोषणा कर” दुसरे उत्तर आले, “मी काय घोषणा करू?” सर्व देह गवत आहे आणि त्यांचा सर्व विश्वासूपणाचा करार वनातील फुलासारखा आहे. गवत सुकते व फुल कोमजते, जेव्हा परमेश्वराच्या श्वासाचा फुंकर त्यावर पडतो; खात्रीने मानवजात गवत आहे. “गवत सुकते आणि फुल कोमेजते पण आमच्या देवाचे वचन सदासर्वकाळ उभे राहते.”

