YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यश. 28

28
एफ्राइमाला इशारा
1एफ्राइममधील मद्यप्यांनो तुमच्या गर्वाच्या मुकुटाला #फुलांचा हारहायहाय! आणि धुंद झालेल्या सुपिक खोऱ्याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फुल त्यास हायहाय!
2पाहा! परमेश्वराकडे पराक्रमी आणि बलवान असा एक आहे. तो गारपिटीप्रमाणे आहे.
नष्ट करणाऱ्या वादळाप्रमाणे, आणि प्रचंड ढगफूटी प्रमाणे, तो पृथ्वीला आपल्या हाताने ताडना करेल.
3एफ्राइममधील मद्याप्यांचा अभिमानी मुकुट पायाखाली तुडवला जाईल.
4त्याच्या वैभवशाली सौंदर्याचे कोमेजणारे फूल, जे खोऱ्याच्या माथ्यावर आहे,
उन्हाळ्यात झाडावर प्रथम आलेल्या अंजिरांप्रमाणे त्याची स्थिती होईल, त्याकडे पाहणारा पाहतो तेव्हा तो त्याच्या हातांत असतानांच तो खाऊन टाकतो.
5त्या दिवशी सेनाधीश परमेश्वर आपल्या लोकांच्या उरलेल्यांना सुंदर मुकुट असा होईल.
6आणि जो न्याय करत बसतो त्यास तो न्यायाचा आत्मा आणि जे वेशीजवळ लढाई मागे हटवतात त्यांना तो पराक्रम असा होईल.
यरूशलेमेस इशारा व अभिवचन
7पण हे सुद्धा द्राक्षरसाने हेलकावे खात आहेत, आणि मादक मद्यानी अडखळत आहेत.
याजक व संदेष्टे सर्वच जण द्राक्षरस व मद्य पिऊन धुंद झाले आहेत आणि मद्याने त्यांना गिळून घेतले आहे.
ते मद्याने अडखळून पडत आहेत आणि ते दृष्टांतात भ्रमतात, ते न्याय करण्यात अडखळतात.
8खरोखर सर्व मेजे ओकारीने भरलेली आहेत, कोठेही स्वच्छ जागा राहिलेली नाही.
9तो कोणाला ज्ञान शिकवील? आणि तो कोणाला निरोप समजावेल?
दुग्धापासून दूर केलेल्यांना किंवा स्तनपानापासून दूर केलेल्यांना काय?
10कारण नियमा वर नियम, नियमावर नियम, ओळीवर ओळ, ओळीवर ओळ, इथे थोडे, तिथे थोडे, असे आहे.
11खरच, तोतऱ्या ओठांनी आणि अन्य भाषेने तो या लोकांशी बोलेल.
12पूर्वी तो त्यांना म्हणाला, “येथे विश्रांती आहे, थकलेल्यांना येथे येऊन विश्रांती घेऊ द्या, आणि हे उत्साहवर्धक आहे.” पण ते काही ऐकेनात.
13लोकांस परमेश्वराचे बोलणे परक्या भाषेसारखे अनाकलनीय वाटले.
हुकूमावर हुकूम, हुकूमावर हुकूम, नियमावर नियम, नियमावर नियम, थोडे इकडे, थोडे तिकडे, एक धडा तिकडे. लोकांनी स्वत:ला पाहिजे ते केले.
म्हणून ते मागे पडून पराभूत झाले, ते सापळ्यात अडकले आणि पकडले गेले.
14याकरिता, जे तुम्ही थट्टा करता, आणि जे तुम्ही यरूशलेमेवर राज्य करता,
ते तुम्ही परमेश्वराचे वचन काय म्हणते ते ऐका.
15तुम्ही म्हटले, “आम्ही मृत्यूबरोबर करारनामा केला आहे.
अधोलोकाशी आम्ही करार केला आहे म्हणून आम्हांला शिक्षा होणार नाही, जेव्हा बुडवणारी शिक्षा पार केली जाईल तेव्हा ती आमच्यापर्यंत येऊ शकणार नाही;
कारण आम्ही कपटाच्या मागे लपलो आहोत व असत्याला आपले आश्रय केले आहे.”
16यासाठी परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो,
“पाहा, मी सियोनेत आधारशिला, पारखलेला धोंडा,
कोपऱ्याचा मोलवान धोंडा, स्थीर पाया म्हणून घालतो.
जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल, तो लाजवला जाणार नाही.
17मी न्याय मोजमापाची काठी,
आणि नितीमत्ता हा ओळंबा असे करीन,
तेव्हा गारपीट खोट्यांचे आश्रय झाडून टाकील,
आणि पूराचे पाणी लपण्याच्या जागा झाकून टाकील.”
18तुमचा मृत्यूशी असलेला करारनामा विरवला जाईल
आणि अधोलोकाशी तुमचा झालेला करार रद्द केला जाईल.
जेव्हा प्रकोपाचा पूर पार केला जाईल,
त्या द्वारे तुम्ही झाकले जाल.
19जेव्हा तो पार जाईल तेव्हा तो तुला झाकून टाकेल.
आणि रोज रोज सकाळी, दिवसा आणि रात्री तो पार जाईल.
आणि जेव्हा संदेश कळेल, तर ते भयच असे होईल.
20कारण अंथरूण पाय पसरावयास खूप लहान आहे,
आणि पांघरुण पांघरायला पुरत नाही एवढे ते अरुंद आहे.
21जसा परासीम डोंगरामध्ये परमेश्वर उभा राहिला होता,
जसा तो गिबोन दरीत रागावला होता त्याप्रमाणे तो रागावेल.
अशासाठी की त्याने आपले कार्य,
त्याचे अद्भूत कृत्य आणि त्याचे विस्मयकारी कृत्य करावे.
22तर आता तुम्ही थट्टा करू नका,
नाहीतर तुमची बंधणे घट्ट करण्यात येतील.
कारण पृथ्वीवर नाश होण्याचा ठराव,
मी सेनाधीश परमेश्वरापासून ऐकला आहे.
23मी सांगत असलेला संदेश लक्षपूर्वक ऐका,
सावध असा, माझे शब्द ऐका.
24पेरणी करण्यासाठी शेतकरी सतत शेत नांगरतो का?
तो सतत मशागत करतो का?
25त्याने जमीन तयार केल्यावरच तो काळे जिरे टाकतो व जिरे विखरतो,
तो गहू रांगेत आणि जव नेमलेल्या ठिकाणी आणि त्याच्या काठाला काठ्या गहू पेरीत नाही काय?
26कारण त्याचा देव त्यास सूचना देतो,
तो त्यास सुज्ञपणे शिकवतो.
27शिवाय, काळे जिरे घणाने मळत नाही, किंवा तिच्यावर गाडीचे चाक फिरवले जात नाही,
पण काळे जिरे काठीने आणि जिरे दंडाने झोडतात.
28भाकरीसाठी धान्य दळतात, पण ते नीट दळले जात नाही.
आणि जरी त्याच्या गाडीचे चाक व त्याचे घोडे ते विखरतात तरी तो ते दळीत नाही.
29सेनाधीश परमेश्वर, जो संकल्पात सुंदर आहे आणि ज्ञानाने श्रेष्ठ आहे. त्याच्याकडून हे आहे.

सध्या निवडलेले:

यश. 28: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन