यश. 10
10
1जे कोणी अन्यायकारक कायदे करतात आणि पक्षपाती हुकूम काढतात त्यांना धिक्कार असो.
2ते गरजूंना न्याय मिळू देत नाहीत आणि माझ्या लोकांतील गरिबांचे हक्क हिरावून घेतात,
विधवांना लूटतात आणि पितृहीनांना आपले भक्ष्य करतात.
3न्यायाच्या दिवशी जेव्हा विध्वंस दुरून येईल तेव्हा तुम्ही काय कराल?
मदतीकरिता कोणाकडे पळाल आणि तुमची संपत्ती कोठे ठेवाल?
4बंदिवानांमध्ये पायाशी दबून राहणे व वधलेल्यांमध्ये पडून राहण्याशिवाय काही राहणार नाही,
कारण या सर्वामुळे परमेश्वराचा क्रोध कमी होणार नाही परंतु मारण्यासाठी त्याचा हात उगारलेला राहील.
परमेश्वर अश्शूराचा उपयोग करून घेतो
5माझ्या क्रोधाचा सोटा, ज्याचा उपयोग मी काठीप्रमाणे माझा राग व्यक्त करण्यासाठी करतो, त्या अश्शूरास धिक्कार असतो.
6मी त्यास उद्धट राष्ट्राविरूद्ध पाठवत आहे. आणि ज्याच्यावर माझा क्रोध काठोकाठ भरुन वाहत आहे त्यांच्याकडे पाठवत आहे.
मी त्यास लूट करण्यासाठी अपहरण करण्यासाठी आणि रस्त्यावरील चिखलाप्रमाणे तुडविण्यासाठी आज्ञा करीन.
7परंतु हा त्याचा उद्देश नाही किंवा असे त्याचे विचार नाहीत.
पुष्कळ राष्ट्रांचा नाश करून त्यांना मिटवून टाकावे असे त्याच्या मनात आहे.
8तो म्हणतो, “माझे सर्व सरदार राजे नाहीत काय?
9कालनो कर्कमीशासारखे नाही काय?
हमाथ अर्पदासारखे नाही काय? शोमरोन दिमिष्कासारखे नाही काय?
10मूर्तीपूजक राज्यावर माझ्या हाताने विजय मिळवला आहे, त्यांच्या कोरीव मूर्ती यरूशलेम आणि शोमरोनापेक्षा मोठ्या होत्या.
11शोमरोन व त्यातील निरुपयोगी मूर्तींचे जसे मी केले,
तसे मी यरूशलेम व त्यातील मूर्तींचे करणार नाही काय?”
12सीयोन डोंगर व यरूशलेम यासंबंधीचे आपले कार्य संपले तेव्हा प्रभू म्हणेल, अश्शूरच्या राजाच्या उन्मत्त हृदयाचे भाषण व त्याच्या गर्वीष्ठ दृष्टीला मी शिक्षा करीन.
13कारण तो म्हणतो, “माझ्या शक्तीने व अकलेने मी वागलो आहे. मी सुज्ञ आहे,
व राष्ट्रांच्या सीमा मी काढून टाकल्या आहेत, त्यांची भांडारे मी लुटली आहेत व शूर वीराप्रमाणे#शूर वीराप्रमाणे जे सिहांसनावर बसतात त्यांना खाली पाडले आहे.
14पक्षाच्या घरट्यातून मिळावे तसे राष्ट्रांचे धन माझ्या हाती लागले आहे,
व पक्षांनी टाकून दिलेली अंडी कोणी गोळा करतो त्याप्रमाणे मी सर्व पृथ्वी एकवट केली आहे.
कोणी त्यांच्या पंखाची फडफड केली नाही किंवा तोंड उघडले नाही की चिवचिव केली नाही.”
15कुऱ्हाड तिचा उपयोग करणाऱ्यापुढे घमेंड करील काय? करवत तिला चालवणाऱ्यापेक्षा अधीक फुशारकी मारेल काय?
काठी उगारणाऱ्याला काठीने उचलावे किंवा लाकडी दांड्याने एखाद्याला उचलावे तसे हे आहे.
16म्हणून सैन्याचा परमेश्वर प्रभू त्याच्या शूर योद्ध्यांमध्ये कमजोरी पाठवील;
आणि त्याच्या गौरवाच्या प्रभावाने अग्नी सारखी ज्वाला पेटेल.
17इस्राएलाची ज्योती#इस्राएलाची ज्योती परमेश्वर अग्नी होईल, आणि त्यांचा पवित्र प्रभू ज्वाला होईल;
तो त्याचे काटेकूटे व काटेझुडपे एका दिवसात जाळून खाक करील.
18परमेश्वर त्याचे रान व सुपीक भूमी यांची शोभा त्यांच्या देह व आत्मा या दोहोसहीत फस्त करील;
जेव्हा रोगी मनुष्य खंगत जातो त्याप्रमाणे हे होईल.
19रानात इतके थोडे वृक्ष उरतील की, एखादे मुलदेखील त्यांना मोजू शकेल.
इस्राएलाचा अवशेष
20त्या दिवशी, इस्राएलाचा अवशेष, याकोबाच्या घराण्यातील बचावलेले, ज्यांनी त्यांना पराजीत केले#अशुराचा राजा त्यांचा आश्रय घेणार नाहीत, तर इस्राएलाचा जो पवित्र परमेश्वर याच्याकडे खरोखर येतील. 21याकोबाचा अवशेष समर्थ देवाकडे परत येईल.
22कारण जरी तुझे लोक इस्राएल, समुद्रतीरीच्या वाळू सारखे असले तरी त्यांच्यातले बचावलेले तेवढे परत येतील. ओतप्रत भरून वाहणाऱ्या न्यायीपणामुळे विध्वंसाचे फर्मान निघाले आहे 23कारण सेनाधीश प्रभू परमेश्वर, सर्व भूमीवर नेमलेला विनाश आणण्याच्या तयारीत आहे.
24म्हणून सेनाधीश प्रभू परमेश्वर म्हणतो, “माझ्या सीयोननिवासी लोकांनो, अश्शूराला भिऊ नका, तो तुला छडीने मारील व मिसराने केल्याप्रमाणे तुझ्यावर काठी उगारेल. 25त्यास भिऊ नको, कारण थोड्याच वेळात तुझ्यावरचा माझा राग निघून जाईल व तो त्यांच्या विनाशासाठी पुढे जाईल.
26मग सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर, मिद्यानाचा ओरेब खडकाजवळ पराभव आला त्याप्रमाणे, चाबूक चालवील, तो त्याची काठी समुद्रावर आणि मिसरात केल्याप्रमाणे उगारेल. 27त्या दिवशी,
तुझ्या खाद्यांवरील त्याचे ओझे आणि तुझ्या मानेवरील त्याचे जूं काढण्यात येईल,” तुझ्या मानेच्या पुष्ठतेमुळे ते जू भंग पावेल.
अश्शूराची चाल
28शत्रू अयाथास आला आहे व मिग्रोनातून पुढे गेला आहे;
आणि त्याने मिखमाशात आपले अन्नधान्य साठवून ठेवले आहे.
29त्यांनी घाट पार केला आहे व गिबा येथे मुक्काम केले आहे.
रामा थरथर कापत आहे व शौलाचा गिबा पळून गेला आहे.
30गल्लीमाच्या कन्ये, मोठ्याने शोक कर! हे लईशा, लक्ष दे!
तू बिचारी अनाथोथ!
31मदमेना पळत आहे,
व गेबीमातील रहिवासी आश्रयासाठी पळत आहेत.
32आजच्या दिवशीच तो नोबास थांबेल
सीयोन कन्येच्या डोंगराला, यरूशलेमेच्या टेकडीला आपल्या हाताची मूठ दाखवील.
33पाहा, सेनाधीश प्रभू परमेश्वर, फांद्या भयंकर रीतीने आदळतील अशा छाटून टाकील;
उंच झाडे तोडले जातील, व उन्मत आहे त्यास खाली आणण्यात येईल.
34रानातील गर्द झाडी तो कुऱ्हाडीने छाटून टाकील, व लबानोन पराक्रमीच्या हातून पतन पावत आहे.
सध्या निवडलेले:
यश. 10: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.