तेव्हा राजा दारयावेशाने बाबेलच्या ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध घेण्याचा आदेश दिला. मेदी प्रांतातील अखमथा राजवाड्यात एक गुंडाळी सापडली. तिच्यावर लिहिले होते. “कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यरूशलेममधील मंदिराच्या बाबतीत राजाने असा आदेश दिला की, जेथे यज्ञ अर्पण करीत त्याठिकाणी देवाचे मंदिर बांधावे. ‘मंदिराचा पाया बांधून काढावा. त्याच्या भिंतीची उंची साठ हात आणि रुंदी साठ हात असावी. मोठ्या दगडांचे तीन थर आणि मोठ्या लाकडाचा एक थर असावा. त्याचा खर्च राजाच्या घरातून केला जावा. देवाच्या घरातील सोन्यारुप्याची पात्रे जी नबुखद्नेस्सराने यरूशलेमेच्या मंदिरातून काढून बाबेलला आणली आहेत ती परत करावी. ती तू यरूशलेमास पाठवावी आणि देवाच्या घरात जमा करावी.’ आता नदीपलीकडील ततनइ, शथर-बोजनइ आणि तुमचे साथीदार अधिकारी जे नदीपलीकडे आहा ते तुम्ही तेथून दूर व्हा. देवाच्या घराचे काम चालू द्या. यहूदी अधिकारी आणि यहूदी वडीलांनी हे देवाचे मंदिर त्याच्या जागी पुन्हा बांधावे. आता माझा आदेश असा आहे. देवाचे मंदिर बांधण्यासाठी यहूदी वडीलजनांसाठी पूर्ण खर्च राजाच्या निधीतून नदीच्या पलीकडील येणाऱ्या खंडणीतून त्या मनुष्यांना देण्यासाठी वापरावा. यासाठी की, त्यांनी त्यांचे काम थांबवू नये. स्वर्गातील देवाच्या होमार्पणासाठी त्या लोकांस जे काही लागेल ते बैल, मेंढे, कोकरे आणि यरूशलेमेमधील याजकांना मागतील तितके गहू, मीठ, द्राक्षरस तेल या वस्तू त्यांना रोजच्या रोज न चुकता द्या. हे करा यासाठी की, त्यांनी स्वर्गातील देवाला अर्पण आणावे आणि राजासाठी, माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करावी. मी तुम्हास आज्ञा करतो की, जो कोणी माझ्या आज्ञेचे उल्लंघन करील त्याच्या घराचे लाकूड काढून त्याच्यावर त्यास टांगावे. त्या अपराधामुळे त्याचे घर कचऱ्याचा ढिग करावा. यरूशलेमेतील देवाच्या या मंदिराचा नाश करण्यास किंवा उल्लंघन करणारा जो कोणी राजा असो किंवा लोक आपले हात लावतील त्यांचा नाश जो देव तेथे राहतो तो करील. मी दारयावेश हा हुकूम करीत आहे. तो पूर्णपणे पाळावा.”
एज्रा 6 वाचा
ऐका एज्रा 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: एज्रा 6:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ