एज्रा 2
2
परत आलेल्या लोकांची यादी
नहे. 7:6-73
1बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराने बाबेलास नेलेले यरूशलेम आणि यहूदा प्रांतातील बंद कैदी मुक्त होऊन आपापल्या नगरात परतले. 2जरुब्बाबेलाबरोबर आलेले ते हे येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. इस्राएली लोकांची यादी येणे प्रमाणे.
3परोशाचे वंशज दोन हजार एकशे बाहत्तर. 4शफाट्याचे वंशज तीनशे बहात्तर. 5आरहाचे वंशज सातशे पंचाहत्तर. 6येशूवा व यवाब यांच्या वंशजातील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशे बारा.
7एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न. 8जत्तूचे वंशज नऊशें पंचेचाळीस. 9जक्काईचे वंशज सातशे साठ. 10बानीचे वंशज सहाशे बेचाळीस.
11बेबाईचे वंशज सहाशे तेवीस. 12अजगादाचे वंशज एक हजार दोनशे बावीस. 13अदोनीकामाचे वंशज सहाशे सहासष्ट. 14बिग्वईचे वंशज दोन हजार छपन्न.
15आदीनाचे वंशज चारशे चौपन्न. 16हिज्कीयाच्या घराण्यातील आटेराचे वंशज अठ्याण्णव. 17बेसाईचे वंशज तीनशे तेवीस. 18योराचे वंशज एकशे बारा.
19हाशूमाचे वंशज दोनशे तेवीस. 20गिबाराचे वंशज पंचाण्णव. 21बेथलहेमातील लोक एकशे तेवीस. 22नटोफातील लोक छपन्न.
23अनाथोथतील लोक एकशे अठ्ठावीस. 24अजमावेथातील लोक बेचाळीस 25किर्याथ-आरीम, कफीरा आणि बैरोथ येथील लोक सातशे त्रेचाळीस. 26रामा व गिबा मधील लोक सहाशे एकवीस.
27मिखमासातील लोक एकशे बावीस. 28बेथेल आणि आय येथील लोक दोनशे तेवीस. 29नबोतील लोक बावन्न. 30मग्वीशाचे लोक एकशे छपन्न. 31दुसऱ्या एलामाचे लोक एक हजार दोनशे चौपन्न. 32हारीम येथील लोक तीनशे वीस. 33लोद, हादीद आणि ओनो येथील लोक सातशे पंचवीस.
34यरीहोतील लोक तीनशे पंचेचाळीस. 35सनाहाचे लोक तीन हजार सहाशे तीस.
36याजक येशूवाच्या घराण्यातील यदयाचे वंशज नऊशें त्र्याहत्तर. 37इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न. 38पशूहराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस. 39हारीमाचे वंशज एक हजार सतरा.
40लेवी, होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचे वंशज चौऱ्याहत्तर. 41मंदिरातील गायक आसाफचे वंशज एकशे अठ्ठावीस. 42मंदिराच्या द्वारपालांचे वंशज, शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूवा, हतीता आणि शोबाई यांचे वंशज एकूण एकशे एकोणचाळीस.
43मंदिरातील नेमून दिलेली सेवा, सीहा, हसूफा, तब्बाबोथ यांचे वंशज. 44केरोस, सीहा, पादोन. 45लबाना, हगबा, अकूबा, 46हागाब, शम्लाई, हानान.
47गिद्देल, गहर, राया, 48रसीन, नकोदा, गज्जाम, 49उज्जा, पासेह, बेसाई, 50अस्ना, मऊनीम, नफसीम.
51बकबुक हकूफ, हरहुर, 52बस्लूथ, महीद, हर्षा, 53बार्कोस, सीसरा, तामह, 54नसीहा, हतीफा. 55शलमोनाच्या सेवाकांचे वंशज, सोताई, हसोफरत, परुदा, 56जाला, दार्कोन, गिद्देल, 57शफाट्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईम, आमी 58मंदिरातील चाकर आणि शलमोनच्या सेवकांचे नेमून दिलेले काम करणारे वंशज एकूण तीनशे ब्याण्णव होते. 59तेल-मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरूशलेमेला आले होते पण आपण इस्राएलाच्या वंशातलेच पूर्वज आहोत हे ते सिद्ध करू शकले नाहीत. 60दलाया, तोबीया आणि नकोदाचे वंशज सहाशे बावन्न. 61आणि याजकांचे वंशज: हबया, हक्कोस, बर्जिल्ल्य (ज्याने बर्जिल्ल्य गिलादी याच्या मुलींपैकी एक मुलगी पत्नी करून घेतली होती आणि त्यास त्याचे नाव पडले होते.) 62आपल्या घराण्याची वंशावळ त्यांनी नोंदपुस्तकात शोधून पाहिली पण त्यांना ती सापडली नाही म्हणून त्यांनी त्यांचे याजकपण अशुद्ध केले. 63याकरीता अधिपतीने त्यांना सांगितले की, उरीम व थुम्मीम घातलेला याजक मंजूर होईपर्यंत त्यांनी पवित्र अर्पण खाऊ नये.
64सर्व समुदाय एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ इतका होता. 65त्यामध्ये त्यांच्या सात हजार तीनशे सदतीस दासदासी यांचा आणि मंदिरातील दोनशे गायकांचा यांचा समावेश नाही.
66त्यांचे घोडे सातशे छत्तीस, खेचरे दोनशे पंचेचाळीस. 67त्यांचे उंट चारशे पस्तीस. त्यांची गाढवे सहा हजार सातशे वीस होती. 68हे सर्वजण यरूशलेमेत परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी खुशीने भेटी दिल्या. 69या वास्तूच्या कामासाठी त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे दिलेली दाने ती अशी: सोने एकसष्ट हजार दारिक, चांदी पाच हजार माने, आणि याजकांचे झगे शंभर.
70याप्रकारे याजक, लेवी आणि इतर काही लोक, गायक, द्वारपाल आणि ज्यांना मंदिरातील सेवा नेमून दिली होती ते आपापल्या नगरांत राहिले. इस्राएलातील सर्व लोक आपापल्या नगरांत वस्ती करून राहिले.
सध्या निवडलेले:
एज्रा 2: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.