YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहे. 43

43
परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरते
1नंतर त्या मनुष्याने जे दार पूर्वेकडे उघडते त्याकडे मला नेले. 2तेव्हा पाहा! पूर्वेकडून इस्राएलाच्या देवाचे तेज आले. त्याचा शब्द पुष्कळ जलांच्या ध्वनीप्रमाणे होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. 3आणि जेव्हा तो नगराचा नाश करायला आला होता तेव्हा जो दृष्टांत मी पाहिला होता त्याच्यासारखे ते दृष्टांत होते, खबार नदीतीरी पाहिलेल्या दृष्टांतासारखाच हा दृष्टांत होता आणि तेव्हा मी उपडा पडलो. 4जे दार पूर्वेकडे उघडे होते त्यातून परमेश्वराचे तेज मंदिरात आले. 5मग आत्म्याने मला उचलले आणि आतल्या अंगणात आणले. पाहा! परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेले. 6मंदिराच्या आतून कोणीतरी माझ्याशी बोलत असल्याचे मी ऐकले आणि तो मनुष्य माझ्या शेजारीच उभा होता. 7तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही माझ्या सिंहासनाची व पादसनाची जागा आहे, येथे मी इस्राएलाच्या लोकांमध्ये सर्वकाळ राहीन. इस्राएल घराणे व त्याचे राजे आपल्या व्यभिचाराने व त्यांच्या राजांनी स्थापिलेल्या प्रेतवत मूर्तींनी आपल्या उंचस्थानात माझ्या नावाला बट्टा लावणार नाहीत. 8त्यांनी आपला उंबरठा माझ्या उंबरठ्याशेजारी, आपले द्वारस्तंभ माझ्या द्वारस्तंभाशेजारी उभारीले आणि माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती. अमंगळ कृत्ये करून त्यांनी माझ्या नावास बट्टा लाविला आहे. म्हणून मी आपल्या रागाने त्यांना नष्ट केले आहे. 9आता त्यांनी आपला व्यभिचार आणि व राजांची प्रेते माझ्यापासून दूर करावी. म्हणजे मी सर्वकाळ त्यांच्यात राहीन.
वेदीसंबंधी नियम
10मानवाच्या मुला, तू इस्राएलाच्या घराण्याला हे घर दाखीव, अशासाठी की, त्यांनी आपल्या अन्यायामुळे लज्जित व्हावे; त्यांनी त्यांच्या वर्णनाविषयी विचार करावा. 11कारण जे त्यांनी केले आहे त्या सर्वामुळे जर ते लज्जित होतील तर त्यांना घराचे रूप, त्याची रचना, व त्याची बाहेर निघण्याची ठिकाणे, व त्याचे प्रवेश, त्याचे सर्व आकार व त्याचे सर्व नियम व त्याचे सर्व प्रकार व त्याचे सर्व विधी दाखीव आणि हे त्याच्यासमक्ष लिही. अशासाठी की, त्यांनी त्याचा सर्व आकार व त्याचे सर्व नियम पाळावे व ते आचरावे. 12हा मंदिरासाठीचा नियम आहे, पर्वतमाथ्यावरची सर्व जागा अति पवित्र आहे. पाहा, हा मंदिराचा नियम आहे. 13हातांनी वेदीची मापे ही आहेत. तिचा तळभाग एक हात व रुंदी एक हात होईल. आणि तिची कड तिच्याकाठापाशी सभोवती एक वीत होईल आणि हा वेदीचा पाया होय. 14तिच्या तळभागापासून खालच्या बैठकीपर्यंत उंची दोन हात व रुंदी एक हात होती. वेदी लहान बैठकीपासून मोठ्या बैठकीपर्यंत चार हात व दोन हात रुंद होती. 15वेदीच्या वरच्या भागाची उंची चार हात होती. वेदीच्या अग्नीकुंडाला लागून वर गेलेली चार शिंगे होती. 16वेदीवरील अग्नीकुंडाची लांबी बारा हात व रुंदी बारा हात अशी चौरस होती. 17तिची बैठक चौदा हात लांब व चौदा हात रुंद होती. त्याची कड दीड हात रुंद होती. तिच्यासभोवती कड अर्धा हात रुंद होता. तिचा तळभाग सभोवार एक हात उंच होता. वेदीच्या पायऱ्या पूर्वेकडे होत्या.” 18पुढे तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, प्रभू परमेश्वर म्हणतो, या वेदीवर होमार्पण करावे व रक्त शिंपडावे म्हणून ते ती तयार करतील त्या दिवशी तिचे नियम हेच आहेत. 19प्रभू परमेश्वर असे म्हणतो, माझी सेवा करावयला माझ्याजवळ येणाऱ्या लेवी वंशातला सादोक कुळातील याजक यास पापार्पणासाठी एक गोऱ्हा दे. 20तू त्याच्या रक्तातले थोडेसे घेऊन वेदीच्या चारी शिंगावर, बैठकीच्या चारी कोपऱ्यावर आणि सर्व बाजूंच्या कडेवर शिंपड. अशा रीतीने तू प्रायश्चित करून शुद्ध कर. 21मग पापार्पण करण्यासाठी बैल घे आणि त्याने पवित्रस्थानाच्या बाहेर मंदिराच्या नेमलेल्या जागी होम करावे. 22नंतर दुसऱ्या दिवशी तू पापार्पणासाठी निर्दोष बोकड घे. जसे त्यांनी बैलाच्या होमाने वेदी शुद्ध केली तसे याजकांनी ती शुद्ध करावी. 23जेव्हा तू तिचे शुद्धीकरण समाप्त करशील तेव्हा कळपातून एक निर्दोष गोऱ्हा व निर्दोष मेंढा अर्पण करशील. 24तू हे परमेश्वरापुढे अर्पण कर. याजक त्यावर मीठ टाकील आणि ते होमार्पण करून परमेश्वरास अर्पण करतील. 25तू सात दिवस, रोज एकएका निर्दोष बकऱ्याचे पापार्पण कर; एक गोऱ्हा व कळपातील एक निर्दोष मेंढा हेही अर्पण करावे. 26सात दिवस ते वेदीचे प्रायश्चित करतील व तिला शुद्ध करतील. अशा रीतीने त्यांनी ते पवित्रीकरण विधी करावे. 27आणि त्यांनी ते दिवस समाप्त केल्यावर असे होईल की, आठव्या दिवशी व त्यापुढे याजक तुमची शांत्यर्पणे वेदीवर अर्पितील आणि मी तुमचा स्विकार करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”

सध्या निवडलेले:

यहे. 43: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन