YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्ग. 1:17-22

निर्ग. 1:17-22 IRVMAR

परंतु त्या इब्री सुइणी देवाचे भय व आदर धरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या, म्हणून त्यांनी मिसरी राजाची आज्ञा मानली नाही; तर त्यांनी जन्मणाऱ्या मुलांनाही जिवंत ठेवले. तेव्हा मिसराच्या राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही असे का केले? तुम्ही जन्मलेल्या मुलांना का जिवंत ठेवले?” त्या सुइणी फारोला म्हणाल्या, “या इब्री स्त्रिया मिसरच्या स्त्रियांपेक्षा फार ताकदवान आहेत; आम्ही सुइणी त्यांच्याकडे जाऊन पोहचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात.” त्याबद्दल देवाने त्या सुइणींचे कल्याण केले. इस्राएल लोक तर अधिक वाढून फार बलवान झाले. त्या सुइणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या म्हणून त्याने त्यांची घराणे वसवली. तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांस आज्ञा दिली, “जो प्रत्येक इब्री मुलगा जन्मेल त्यास तुम्ही नाईल नदीमध्ये फेकून द्या, पण प्रत्येक मुलगी मात्र जिवंत ठेवा.”