YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानि. 5:1-9

दानि. 5:1-9 IRVMAR

काही वर्षानंतर, एकदा बेलशस्सर राजाने आपल्या हजारो सरदारांस घेवून एक मोठी मेजवानी दिली आणि त्यांच्या समोर तो द्राक्षरस प्याला. बेलशस्सराने द्राक्षरस चाखल्यावर आज्ञा केली की, सोन्या चांदीची ती पात्रे घेवून या जी त्याचा बाप नबुखद्नेस्सराने यरूशलेमेच्या मंदिरातून आणली होती. ह्यासाठी की, राजा, त्याचे सरदार आणि त्याच्या पत्नी व उपपत्नी हयांना त्यातून द्राक्षरस पिता येईल. तेव्हा सेवक सोन्याची ती पात्रे घेवून आले, जी यरूशलेमेतील देवाच्या मंदीरातून आणलेली होती. मग राजा त्याचे सरदार, त्याच्या पत्नी त्याच्या उपपत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली. ते द्राक्षरस पिवून सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड आणि दगडाच्या घडलेल्या मूर्तीचे स्तवन करू लागले. त्या क्षणाला मानवी हाताची बोटे तिथे दिपस्तंभासमोर प्रगट झाली आणि त्यांनी राजवाड्यातील भिंतीच्या गिलाव्यावर असे काही लिहीले जे राजास वाचता येईल. तेव्हा राजाचा चेहरा पडला तो चिंतातूर झाला, त्याचे पायाचे सांधे साथ देईना आणि त्याचे गुडघे लटपटू लागले. राजाने मोठ्याने बोलून आज्ञा केली की, जे भूतविद्या करणारे खास्दी लोक, ज्योतिषी यांना घेवून या. राजा बाबेलातील ज्ञानी लोकांस म्हणाला, “जो कोणी हे लिखान वाचून त्याचा अर्थ मला सांगेल त्यास जांभळा पोशाख आणि सोन्याचा गोफ देण्यात येईल. जो राज्यांतील तीन राज्यकर्त्यातील एक होईल. राजाचे सर्व ज्ञानी लोक आले पण त्यांना तो लेख वाचता येईना आणि त्याच्या अर्थ राजास सांगता येईना.” तेव्हा राजा बेलशस्सर चिंतातूर झाला आणि त्याचे तोंड पडले. त्याचे सरदार गोंधळून गेले.