दानि. 11
11
1दारयावेश मेदी राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मी यासाठी आलो की, मिखाएलास मदत करून त्यास संरक्षण द्यावे.
उत्तरेचा राजा व दक्षिणेचा राजा
2आणि आता मी तुला सत्य प्रगट करतो. पारसात तिन राजे उदयास येतील आणि चौथा राजा इतरांपेक्षा जास्त धनवान होईल जेव्हा तो आपल्या धनाच्या मदतीने बलवान झाला मग तो सर्वांस ग्रीसच्या राज्याच्या विरोधास उठवील.
3एक प्रबळ राजा उदयास आल्यावर तो आपली सत्ता फार गाजवील व मनात येईल तसा वागेल. 4आणि तो उभा झाल्यावर त्याचे राज्य मोडून जाईल, चार दिशांत त्यांचे विभाग होईल; पण ते त्याच्या संततीला प्राप्त होणार नाही, आणि राज्य उपटले जाईल व ते त्यांच्याखेरीज इतरांस प्राप्त होईल.
5दक्षिणेचा राजा#मिसराचा राजा प्रबळ होईल पण त्याचा एक सरदार त्याहूनही बलवान होईल आणि त्याहून मोठ्या राज्यावर राज्य करील. 6काही वर्षानंतर जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा आपसात मिलाप करतील. दक्षिणेच्या राजाची मुलगी उत्तरेच्या राजाकडे#सिरीयाचा राजा कराराची खात्री करण्यास येईल पण तिचे बळ निघून जाईल व तिला सोडून देण्यात येईल ती आणि ज्यांनी तिला आणले ते तिचे वडील आणि तिला त्यावेळी मदत करणारा सोडून देण्यात येईल.
7तरी तिच्या कुळातून एक अंकूर उगवेल तो तिची जागा घेईल तो सैन्यासह उत्तरेच्या राजाच्या गडात प्रवेश करून त्याच्याशी युध्द करील आणि त्यामध्ये तो विजयी होईल. 8तो त्यांची दैवते ओतीव मुर्त्या आणि मौल्यवान सोने व चांदीची पात्रे मिसर देशात घेऊन जाईल आणि काही वर्षासाठी उत्तरेच्या राजावर हल्ला करणार नाही. 9उत्तरेचा राजा, दक्षिणेच्या राजावर चढाई करून जाईल पण त्यास स्वदेशी परत जावे लागेल.
10त्याचे पुत्र लढाई करतील आणि मोठे सैन्य जमवतील ते पुराप्रमाणे येत राहतील ते लढाई करून पुन्हा लढाई करून गडापर्यंत धडकतील.
11दक्षिणेचा राजा रागात येऊन उत्तरेच्या राजाबरोबर लढाई करील उत्तरेचा राजा मोठे सैन्य उभारील पण ते सैन्य दक्षिणेच्या राजास देण्यात येईल. 12जेव्हा सैन्य पुढे चालत राहील, तेव्हा दक्षिणेच्या राजाचे मन गर्वाने भरुन जाईल तो त्याच्या लाखो शत्रूंचा नाश करील तरी तो यशस्वी होणार नाही.
13उत्तरेचा राजा पुन्हा येईल तेव्हा आधीपेक्षा मोठे उकृष्ट सैन्य व धन घेऊन येईल सैन्य आणि उपकरणे घेऊन येईल.
14त्यावेळी अनेक लोक दक्षिणेच्या राजाच्या विरोधास उठतील, तुझ्या लोकातून#दानिएलाचे यदुही लोक आडदांड लोक दृष्टांत पूर्ण करण्यास उठतील. पण ते पडतील.
15अशाप्रकारे उत्तरेचा राजा येऊन तटबंदीच्या शहराभोवती मोर्चे लावून नगर काबीज करील. दक्षिणेचे त्यापुढे काही एक चालणार नाही, त्याच्या उत्तम सैनिकही त्यापुढे शक्तीहीन होतील. 16पण उत्तरेचा राजा मनात येईल तसे दक्षिणेच्या राजाशी करील त्यास कोणी थांबवू शकणार नाही, त्या सुंदर भूमीवर तो हाती नाश घेऊन उभा राहील.
17उत्तरेचा राजा आपल्या राज्यातील सर्व ताकदीने येईल. आणि तो उत्तरेच्या राजाशी करार करील तो दक्षिणेच्या राजाला आपली कन्या भष्ट करण्यास देईल म्हणजे त्यास दक्षिणेचे राज्य नष्ट करता येईल पण त्याची योजना यशस्वी होणार नाही. 18ह्यानंतर उत्तरेचा राजा आपले लक्ष द्विपाकडे लावून त्यापैकी बरेच काबीज करील; पण एक सरदार त्याने केलेली अप्रतिष्ठा नाहीशी करील; आणखी तो आपली अप्रतिष्टा त्याच्यावर फिरवील. 19मग तो आपल्या देशातील दुर्गाकडे आपला मोर्चा लावील पण तो ठोकर खाऊन पडेल व तो सापडणार नाही.
20नंतर त्याच्या जागी एक उदयास येईल जो त्या वैभवी राज्यात कर देण्याचा आग्रह करील पण काही दिवसात त्याचा नाश होईल पण तो रागात किंवा युध्दात होणार नाही. 21मग त्याच्या जागी नकारलेला आणि वैभव न मिळालेला असा एक उदयास येईल तो शांतपणे येऊन खुशामतीने राज्य प्राप्त करील. 22आणि उचंबळणारी बळे त्याच्या समोरून ओसरून जातील, व मोडून खातील, आणि कराराचा अधिपतीही मोडून जाईल.
23त्याच्यासोबत संघटन केल्यापासून तो कपटाने वागेल. थोड्याशा लोकांच्या मदतीने तो बलवान होईल. 24सूचना न देता तो प्रांतातील धनवान भागात येईल आणि तो ते करील जे त्याच्या वडिलाने किंवा त्यांच्या वडीलांच्या वडीलाने केले नाही ते तो करील; आपल्या सहकाऱ्यास लूट आणि धन वाटून देईल काही काळ तो किल्ले घेण्याचे कारस्थान करील.
25दक्षिणेच्या राज्याशी तो लढण्यास पूर्ण शक्तीने तयारी करेल दक्षिणेचा राजा मोठा फौजफाटा घेऊन युध्द करेल पण कटकारस्थानामुळे त्याचा निभाव लागणार नाही. 26जे त्याच्या मेजावर जेवले ते पण त्याचा घात करु पाहतील. त्याचे सैन्य पुरासारखे वाहून जाईल आणि त्यापैकी अनेक मरतील. 27हे दोन्ही राजे एकमेकांच्या विरोधात वाईट योजतील एकाच मेजावर बसून एकमेकांशी लबाड बोलतील पण त्यातून काही निघणार नाही, कारण शेवट हा नेमलेल्या वेळीच होणार.
28उत्तरेचा राजा मोठी संपत्ती आपल्या देशात घेऊन जाईल पण त्याचे मन पवित्र कराराच्या विरोधात राहील त्याच्या मनात येईल तसे तो वागेल आणि तो आपल्या भूमीत परत येईल. 29नेमलेल्या समयी तो दक्षिणेस परतून पुन्हा हल्ला करील पण हयावेळी त्याचे काहीच चालणार नाही. 30कारण कित्तीमाची जहाजे त्याच्या विरोधात येतील आणि तो निराश होऊन मागे फिरेल तो पवित्र करारावर खिन्न होऊन ज्यांनी हा करार सोडला त्यांच्यावर लक्ष लावील.
31त्याचे सैन्य उठून वेदी आणि गड भ्रष्ट करतील रोजची बलिहवने ते बंद करतील आणि नाशदायी अमंगळाची ते स्थापना करतील. 32जे कराराविषयी दुष्टपण करतात त्यास तो फुस लावील, पण जे लोक आपल्या देवाला जाणतात ते बलवान होऊन मोठे काम करतील.
33लोकांमधील चतूर इतरांना समज देतील पण ते बरेच दिवस तलवार, अग्नी, बंदिवास, व लूटालूट यांनी संकटात पडतील. 34ते पडतील तेव्हा त्यांना थोडी मदत मिळेल आणि बरेच लोक गोड बोलून त्यांच्यात सामील होतील. 35सुज्ञ पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील, ते अशासाठी की, त्यांनी कसोटीस लागून अंतसमयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे; कारण नेमलेला अंतसमय प्राप्त होण्यास अद्यापि अवधी आहे.
36राजा मनात येईल तसे तो करील; तो आपणास इतर सर्व देवासमोर उंच आणि महान करील आणि देवा विरोधात तो धक्कादायक गोष्टी बोलेल, कोपाची पूर्णता होईपर्यंत तो बढती मिळवील जे ठरले आहे ते घडेलच. 37तो आपल्या पुर्वजाचे देव, स्त्रियांच्या प्रेमाचा किंवा कोणत्याही देवाचा सन्मान करणार नाही तो गर्वाने वागेल आणि आपणास त्या सर्वांहून उंच करील.
38आणि तो आपल्या ठिकाणी गडांच्या देवाला मान देईल, आणि जो देव त्याच्या पूर्वजांनी जाणला नाही त्यास तो सोन्याने व रुप्याने व मोलवान पाषाणांनी व मनोरम पदार्थांनी मान देईल. 39तो परक्या देवाच्या मदतीने#परक्या देवांची पूजा करणाऱ्यांच्या मदतीने बलाढ्य दुर्गावर हल्ला करील. जे ह्याला जाणतात त्यांचा तो आदर करील त्यांना तो अनेक लोकांवर शासक नेमील व किंमतीसाठी जमिनीचे तुकडे करील.
40शेवटच्या वेळी दक्षिणेचा राजा हल्ला करील. उत्तरेचा राजा त्याकडे रथ, स्वार आणि अनेक जहाजे घेऊन वाऱ्यासारखा येईल. तो अनेक राज्यावर हल्ला करून त्यांना पुरासारखे पुसून टाकील. 41तो वैभवी देशात येईल आणि अनेक लोक पडतील पण अनेकांचा त्याच्या हातून बचाव होईल अदोम, मवाब आणि अम्मोनाचे सरदार, हे त्याच्या हातून सुटतील.
42तो अनेक देशावर आपले बळ वाढवील, मिसर त्यातून सुटणार नाही. 43त्यास मिसर देशातील सोने, आणि रुपे आणि तेथील सर्व खजिन्यावर त्यास अधिकार मिळाले. लुबी आणि कुशी त्याची चाकरी करतील.
44पण पूर्वेकडून आणि उत्तरेकडून येणारी बातमी त्यास चिंताग्रस्त करील तेव्हा तो मोठया रागाने अनेकांचा नाश करण्यासाठी निघून जाईल. 45तो आपला शाही तंबू समुद्राच्या आणि पवित्र पर्वताच्या दरम्यान ठोकील. तो त्याच्या शेवटास येईल. पण कोणी त्यास मदत करणार नाही.
सध्या निवडलेले:
दानि. 11: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.