पारसाचा राजा कोरेश हयाच्या तिसऱ्या वर्षी दानीएल (ज्याला बेल्टशस्सर हे नाव होते) यास संदेश प्राप्त झाला जो सत्य होता, म्हणजे तो एक मोठ्या युध्दाविषयी होता. दानीएलास तो दृष्टांत व त्या दृष्टांताचा समज प्राप्त झाला. त्या दिवसात मी दानीएल, तीन आठवडे शोक करत होतो. ते तिन आठवडे संपेपर्यंत मी पक्वान्न खाल्ले नाही मी द्राक्षरस प्यालो, नाही माझ्या डोक्याला तेल लावले नाही. पहिल्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी मी महानदीच्या काठावर होतो. मी डोळे वर करून पाहिले तर मला तागाची वस्त्रे घातलेला आणि कंबरेत उफाज देशाच्या शुध्द सोन्याचा पट्टा घातलेला एक पुरुष दिसला. त्याचे शरीर रत्नासारखे असून त्याचा चेहरा विजेसारखा होता, त्याचे डोळे जळणाऱ्या मशालीसारखे असून त्याचे बाहू आणि पाय उजळ पितळेसारखे होते आणि त्याचा शब्दाचा आवाज मोठ्या समुदायाच्या आवाजासारखा होता.
दानि. 10 वाचा
ऐका दानि. 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: दानि. 10:1-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ