2 शमु. 8
8
दावीद आपल्या राज्याचा विस्तार करतो
1 इति. 18:1-13
1यानंतर दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्या राजधानीच्या शहरावरील त्यांची सत्ता त्यांच्या हातून काढून घेतली. 2मवाबातील लोकांचाही त्याने पराभव केला. त्या सर्वांना त्याने जमिनीवर पडून रहायला लावले आणि दोरीच्या सहाय्याने त्यांच्या रांगा केल्या. त्यापैकी दोन रांगांतील लोकांस ठार केले आणि तिसऱ्या रांगेतील लोकांस जीवदान दिले. अशाप्रकारे मवाबातील हे लोक दावीदाचे अंकित बनले. त्यांनी दावीदाला खंडणी दिली. 3रहोबाचा मुलगा हद्देजर हा सोबाचा राजा होता. फरात नदीजवळच्या आपल्या जमिनीचा ताबा घ्यायला, तिची हद्द निश्चित करायला दावीद तिकडे गेला तेव्हा त्याने या हद्देजरचा पराभव केला. 4सतराशे घोडेस्वार आणि वीसहजारांचे पायदळ त्याने सोबाचा राजा हद्देजरकडून बळकावले रथाचे शंभर घोडे वगळता सर्व घोड्यांना त्याने कुचकामी करून टाकले. 5दिमिष्कामधील अरामी लोक सोबाचा राजा हद्देजरच्या मदतीला आले. त्या बावीस हजार अरामी लोकांसही दावीदाने ठार केले. 6मग त्याने दिमिष्कातील अरामात आपले बस्थान वसवले. हे अरामी लोकही दावीदाचे अंकित झाले आणि त्यांनी खंडणी आणली. परमेश्वराने, दावीदाला तो जाईल तेथे यश दिले. 7हद्देजरच्या सैनिकांकडील #अधिकाऱ्यांकडील सोन्याच्या ढाली दावीदाने ताब्यात घेऊन त्या यरूशलेमेला आणल्या. 8हद्देजरच्या ताब्यातील बेटा आणि बेरोथा (हद्देजरची नगरे) येथील अनेक पितळी वस्तुही दावीदाने आणल्या. 9हमाथचा राजा तोई याने हद्देजरच्या संपूर्ण सैन्याचा दावीदाने पाडाव केल्याचे ऐकले. 10तेव्हा त्याने आपला मुलगा योराम याला, राजा दावीद याच्याकडे पाठवले. हद्देजरशी लढाईकरून त्याचा पाडाव केल्याबद्दल योरामने त्याचे अभिनंदन करून त्यास आशीर्वाद दिले. (हद्देजरने यापूर्वी तोईशी लढाया केल्या होत्या) योरामने सोने, चांदी आणि पितळेच्या भेटवस्तू दावीदासाठी आणल्या होत्या. 11दावीदाने त्या स्विकारून परमेश्वरास अर्पण केल्या. या आधीच्या समर्पित वस्तूबरोबरच त्या ठेवून दिल्या. आपण पराभूत केलेल्या राष्ट्रांमधून दावीदाने लूट आणलेली होती. 12दावीदाने अरामी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांचा पराभव केला. रहोबाचा मुलगा, सोबाचा राजा हद्देजर याचा पराभव केला. 13क्षार खोऱ्यातील अठरा हजार अरामींचा पाडाव करून तो परत आला तेव्हा त्याचा जयजयकार झाला. 14अदोममध्ये त्याने शिपायांची ठाणी बसवली. अदोमच्या सर्व प्रांतात अशी ठाणी बसवली. अदोमी लोक त्याचे अंकित झाले. जेथे जाईल तेथे परमेश्वराने दावीदाला विजय मिळवून दिला.
दाविदाचे अंमलदार
1 इति. 18:14-17
15दावीदाची सत्ता सर्व इस्राएलवर होती. त्याने प्रजेला न्यायाने धर्माने वागवले. 16सरुवेचा मुलगा यवाब सेनापती होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबारनवीस #इतिहासकारकहोता. 17अहीटूबाचा मुलगा सादोक आणि अब्याथारचा मुलगा अहीमलेख हे याजक होते. सराया कार्यवाह होता. 18यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता. दावीदाचे पुत्र महत्वाचे मंत्री #याजकहोते.
सध्या निवडलेले:
2 शमु. 8: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.