YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 शमु. 6:1-11

2 शमु. 6:1-11 IRVMAR

दावीदाने पुन्हा इस्राएलातून निवडक तीस हजार माणसे निवडून सैन्य तयार केले. आणि दावीद आपल्याजवळ असलेल्या सर्व लोकांसोबत यहूदातील बाला येथे गेला, आणि तेथून देवाचा कोश, ज्यावर ते नाव, म्हणजे करुबांच्या वरती राजासनी बसणारा जो सैन्यांचा परमेश्वर त्याचे नाव लिहिले आहे तो देवाचा कोश वर आणायला चालला. अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून दावीदाच्या लोकांनी हा देवाचा कोश आणला. मग तो एका नव्या गाडीवर ठेवला. अबीनादाबचे पुत्र उज्जा आणि अह्यो हे ती गाडी हाकीत होते. अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून हा देवाचा कोश त्यांनी वाहून आणला. अह्यो देवाच्या कोशापुढे चालू लागला. तेव्हा देवदारूच्या लाकडापासून केलेली नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरु, झांजा वाजवत दावीद आणि त्याच्या बरोबरचे सर्व इस्राएल लोक नाचत परमेश्वरापुढे चालू लागले. ते सर्व नाखोनच्या खळ्यापाशी आले तेव्हा बैल अडखळल्याने देवाचा कोश गाडीतून पडायला लागला. तेव्हा उज्जाने तो सावरला. पण परमेश्वराचा कोप त्याच्यावर होऊन उज्जाला मरण आले. देवाच्या कोशाला स्पर्श करून त्याने देवाविषयी अनादर दाखवला. तेव्हा कराराच्या कोशा शेजारीच उज्जा गतप्राण झाला. परमेश्वरने उज्जाला ताडना दिली यामुळे दावीद फार दु:खी झाला आणि त्याने या जागेचे नाव पेरेस-उज्जा म्हणजे, उज्जाला शासन, असे ठेवले. आजही ते नाव प्रचलित आहे. मात्र दावीदाला त्या दिवशी परमेश्वराचा धाक वाटू लागला तो मनात म्हणाला, “आता मी हा पवित्र कोश माझ्याकडे कसा आणू?” परमेश्वराचा पवित्र कोश (पवित्र कोशाची पेटी) आपल्याबरोबर दावीद नगरात आणण्याची दावीदाची इच्छा नव्हती, त्या ऐवजी, त्याने तो कोश (दावीदानगरात न हलवता) एका बाजूस नेऊन ओबेद-अदोम गित्ती याच्या घरी ठेवला. तिथे परमेश्वराचा कोश तीन महिने होता. ओबेद-अदोमाच्या कुटुंबाला देवाने आशीर्वाद दिला.