सरुवेचा मुलगा यवाब याचा भाऊ म्हणजे अबीशय. अबीशय या तीन वीरांचा नायक होता. आपल्या भाल्याने त्याने तीनशे शत्रू सैनिकांना ठार केले. आणि त्या तिघांमध्ये नाव मिळवले. त्या तिघांमध्ये तो सर्वाधिक प्रसिद्ध होता. त्यांचा तो नायकही होता. पण तो पहिल्या तिघांच्यापैकी नव्हता. यहोयादा याचा मुलगा बनाया हाही एक होता. तो एका पराक्रमी मनुष्याचा पुत्र होता. तो कबसेल इथून आलेला होता. बनायाने बरेच पराक्रम गाजवले मवाबमधील अरीएलच्या दोन मुलांना त्याने मारले. एकदा बर्फ पडत असताना त्याने गुहेत शिरून सिंह मारला. एका धिप्पाड मिसरी मनुष्यासही त्याने मारले. या मिसरी मनुष्याच्या हातात भाला होता तर बनायाच्या हातात फक्त काठी. बनायाने त्याचा भाला हिसकावून घेतला आणि त्याच्याच भाल्याने त्या मिसरी मनुष्याचा जीव घेतला. बनायाने अशी बरीच कृत्ये केली त्यानेही या तिघांइतकाच नावलौकिक मिळवला. तो तीस वीरांच्या तीस वीर-दावीदाच्या अतिशय शूर सैनिकांचा गट म्हणजे हे लोक होत. यापेक्षा तो अधिक प्रसिद्ध होता. पण तरी पहिल्या तिघांच्या पदाला तो पोचला नाही. दावीदाने त्यास आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले. यवाबाचा भाऊ असाएल हा त्या तिसातला एक होता. बाकीच्या वीरांची नावे पुढीलप्रमाणे:बेथलहेममधील दोदो याचा मुलगा एलहानान, शम्मा हरोदी, अलीका हरोदी, हेलस पलती, इक्केश तकोई याचा मुलगा ईरा, अबीयेजर अनाथोथी, मबुन्नय हूशाथी, सलमोन अहोही, महरय नटोफाथी, बाना नटोफाथी याचा मुलगा हेलेब, बन्यामीनच्या वंशातील, गिबामधला रीबय याचा मुलगा इत्तय, बनाया पिराथोनी, गाश झऱ्याजवळचा हिद्दय, अबी-अलबोन अर्बाथी, अजमावेथ बरहूमी, अलीहाबा शालबोनी, याशेन घराण्यातला योनाथान, शम्मा हारारी, शारार अरारी याचा मुलगा अहीयाम, माकाथीचा मुलगा अहसबय याचा मुलगा अलीफलेट, अहिथोफेल गिलोनी याचा मुलगा अलीयम, हेस्री कर्मेली, पारय अर्बी सोबा मधील नाथोन याचा मुलगा इगाल, बानी यादी, सेलक अम्मोनी, सरुवेचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी, ईरा इथ्री, गारेब इथ्री, उरीया हित्ती, असे एकंदर सदतीस.