YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 18:13-18

2 राजे 18:13-18 IRVMAR

हिज्कीया राजा ह्याच्या चौदाव्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदातील सर्व तटबंदी नगरांवर हल्ला चढवून त्यांचा ताबा घेतला. तेव्हा यहूदाचा राजा हिज्कीया याने अश्शूराच्या राजाला लाखीश येथे निरोप पाठवला की, “माझ्याकडून अपराध झाला आहे, तर आता माझ्या पासून निघून जा. तू जे माझ्यावर लादशील ते मी सहन करीन.” यावर अश्शूराच्या राजाने यहूदाचा राजा हिज्कीया याला तिनशे किक्कार चांदी व तीस किक्कार सोने अशी खंडणी मागितली. तेव्हा हिज्कीयाने परमेश्वराच्या घरात व राजाच्या राजवाड्यातील भांडारात असणारी सर्व चांदी त्यास दिली. मग हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे आणि सोन्याच्या पल्याने मढवलेले खांब काढून घेतले आणि अश्शूरच्या राजाला हे सोने दिले. पण अश्शूरच्या राजाने तर्तान व रब-सारीस व रब-शाके यांना मोठ्या सैन्यासोबत लाखीशाहून यरूशलेमामध्ये हिज्कीया राजा कडे पाठवले. तेव्हा ते यरूशलेमेस चढून आले, आणि वरच्या तलावाच्या पाटाजवळ परिटाच्या शेताच्या रस्त्यावर उभे राहिले. त्यांनी राजाला निरोप पाठवला तेव्हा, हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम जो घरावरचा कारभारी, व शेबना चिटणीस आणि नोंदणी लेखक व आसाफचा मुलगा यवाह हे त्यांना भेटावयास पुढे आले.