त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाने लोकांस सावध करण्यासाठी मोठ्या निकडीने संदेष्टे पाठवले. आपल्या प्रजेविषयी आणि मंदिराविषयी त्याच्या मनात करुणा होती म्हणून परमेश्वर असे वागला. त्यांचा अथवा मंदिराचा नाश होऊ नये असे परमेश्वरास वाटत होते. पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली. त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले. तेव्हा खास्दी राजाला देवाने यहूदा व यरूशलेमेवर स्वारी करायला लावले. त्याने मंदिरात असलेल्या तरुणांनाही ठार केले. यहूदा व यरूशलेममधील लोकांवर त्याने दयामाया दाखवली नाही. लोकांस जिवे मारताना तरुण, कुमारी, वृध्द स्त्री-पुरुष, यावर त्याने तलवार चालवावी. देवानेच नबुखद्नेस्सराला यहूदा व यरूशलेमेच्या लोकांस शासन करायची मुभा दिली होती. देवाच्या मंदिरातील लहानमोठी सर्व पात्रे व निधी, आणि राजा व त्याचे सरदार ह्यांचे निधी ही सर्व तो बाबेलास घेऊन गेला. त्यांनी देवाच्या घराला आग लावली, यरूशलेमची तटबंदी उद्ध्वस्त केली, राजा आणि सरदार यांच्या मालकीची घरे जाळली. यरूशलेम येथील प्रत्येक मौल्यवान वस्तू लुटून नेली किंवा नष्ट केली. अजूनही हयात असलेल्या व तलवारीपासून वाचलेल्या लोकांस नबुखद्नेस्सरने बाबेलला नेऊन गुलाम केले. पुढे पारसाचे राज्य येऊन त्यांनी बाबेलचा पराभव करेपर्यंत हे गुलाम तेथेच राहिले. अशाप्रकारे, यिर्मयाकडून इस्राएलाबद्दल परमेश्वराने जे वदवले ते प्रत्यक्षात घडले. परमेश्वर यिर्मयाद्वारे म्हणाला होता: हे ठिकाण सत्तर वर्षे निर्मनुष्य आणि उजाड राहील. लोकांनी न पाळलेल्या शब्बाथाच्या भरपाईसाठी असे होईल.
2 इति. 36 वाचा
ऐका 2 इति. 36
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 इति. 36:15-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ