बंधूनो, तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हासही माहीत आहे. परंतु पूर्वी फिलिप्पैत आम्ही दुःख भोगून व अपमान सोसून, हे तुम्हास माहीतच आहे, मोठा विरोध असता, देवाची सुवार्ता तुम्हास सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले. कारण आमचा बोध फसवण्याने अथवा अशुद्धपणा ह्यांतून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता; तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हास पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो; आम्ही मनुष्यांना खूश करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खूश होईल तसे बोलतो. कारण आम्ही खुशामत करणारे भाषण कधी करीत नव्हतो, हे तुम्हास माहीत आहे तसेच लोभ ठेवून ढोंगीपणाने वागलो नाही. देव साक्षी आहे; आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आम्हास आपला विशेष अधीकार चालवता आला असता तरी आम्ही मनुष्यांपासून, तुम्हापासून किंवा दुसऱ्यांपासून गौरव मिळविण्याची खटपट करीत नव्हतो; तर आपल्या मुलांबाळांचे पालनपोषण करणाऱ्या आईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हास केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवही देण्यास तयार होतो.
1 थेस्स. 2 वाचा
ऐका 1 थेस्स. 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 थेस्स. 2:1-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ