तुझा बोध आशीर्वादित होवो; आज रक्त पाडण्याच्या दोषापासून आणि आपल्या हाताने सूड घेण्यापासून मला जिने आवरिले ती तू आशीर्वादित हो. कारण तुझे वाईट मी करणार होतो ते ज्याने मला करू दिले नाही तो इस्राएलाचा देव परमेश्वर जिवंत आहे; जर तू मला भेटायला लवकर आली नसतीस तर खचित नाबालाचा एक पुरूष देखील सकाळ उजाडेपर्यंत जिवंत राहिला नसता.” मग जे तिने दावीदासाठी आणले होते ते त्याने तिच्या हातातून घेतले व तिला म्हटले, “तू आपल्या घरी शांतीने जा, पाहा मी तुझी वाणी ऐकली आहे आणि तुला मान्य केले आहे.” मग अबीगईल नाबालाकडे आली आणि पाहा त्याने आपल्या घरी राजाच्या मेजवाणीसारखी मेजवाणी केली होती. तेव्हा नाबालाचे मन त्याच्या आत संतुष्ट होते कारण तो मद्य पिऊन फार मस्त झाला होता, म्हणून तिने पहाट उजाडेपर्यंत त्यास अधिक उणे काहीच सांगितले नाही. मग असे झाले की, सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर त्याच्या पत्नीने या गोष्टी त्यास सांगितल्या तेव्हा त्याचे मन त्याच्या आत मेल्यासारखे झाले व तो दगडासारखा झाला. नंतर असे झाले की, सुमारे दहा दिवसानंतर परमेश्वराने नाबालाला मारले व तो मेला. नाबाल मेला असे दावीदाने ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “ज्याने माझ्या अपमानाचा सूड नाबालावर उगवला आहे आणि ज्याने आपल्या सेवकाला वाईट करण्यापासून आवरून धरले तो परमेश्वर धन्यवादीत असो. परमेश्वराने नाबालाची दुष्टाई त्याच्याच मस्तकावर परत घातली आहे.” मग दावीदाने अबीगईलेकडे सेवकाला पाठवून तिला आपली पत्नी करण्याविषयीची गोष्ट काढली. आणि दावीदाने चाकर कर्मेलास अबीगईलेकडे येऊन तिला म्हणाले, “दावीदाने तू त्याची पत्नी व्हावे म्हणून आम्हांला तूझ्याकडे पाठवले आहे.” तेव्हा ती उठून भूमीकडे लवून नमली व म्हणाली, “पाहा तुमची दासी माझ्या प्रभूच्या चाकरांचे पाय धुवायला चाकरीण होण्यास तयार आहे.” मग अबीगईल घाई करून उठली व गाढवावर बसून निघाली आणि तिच्या पाच सख्या तिच्या मागे गेल्या; आणि ती दावीदाच्या सेवकाच्या मागून गेली आणि त्याची पत्नी झाली.
1 शमु. 25 वाचा
ऐका 1 शमु. 25
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 शमु. 25:33-42
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ