YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 शमु. 12:1-5

1 शमु. 12:1-5 IRVMAR

शमुवेल सर्व इस्राएलास म्हणाला, “पाहा जे तुम्ही मला म्हणाला ती प्रत्येक गोष्ट ऐकून मी तुम्हावर एक राजा नेमला आहे. तर आता पाहा, राजा तुम्हापुढे चालत आहे, आणि मी म्हातारा होऊन केस पिकलेला झालो आहे; पाहा, माझे पुत्र तुम्हाजवळ आहेत. व मी आपल्या तरुणपणापासून आजपर्यंत तुम्हापुढे चाललो आहे. मी हा येथे आहे; परमेश्वरासमोर व त्याच्या अभिषिक्तासमोर माझ्याविरूद्ध साक्ष द्या. मी कोणाचा बैल घेतला काय? मी कोणाचे गाढव घेतले काय? मी कोणाला लबाडीने लुबाडले आहे काय? मी कोणावर जुलूम केला आहे काय? मी डोळे बंद करून कोणाकडून लाच घेतली काय? माझ्याविरूद्ध साक्ष द्या, म्हणजे मी त्याची भरपाई करीन.” ते म्हणाले, “तुम्ही आम्हास फसवले नाही, आमच्यावर जुलूम केला नाही, किंवा कोणा मनुष्याच्या हातून काही चोरले नाही.” मग तो त्यांना म्हणाला, “माझ्या हाती तुम्हास काही सापडले नाही याविषयी आज परमेश्वर तुमच्यासंबंधाने साक्षी आहे आणि त्याचा अभिषिक्त साक्षी आहे.” ते म्हणाले, “परमेश्वर साक्षी आहे.”