ज्ञानी मनुष्य कोठे आहे? विद्वान कोठे आहे? या जगातील वाद घालणारा कोठे आहे? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरवले नाही का? म्हणून, देवाचे ज्ञान असतानाही, या जगाला स्वतःच्या ज्ञानाने देवाला ओळखता आले नाही, तेव्हा आम्ही जो “मूर्खपणाचा” संदेश गाजवितो त्यामुळे जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांचे तारण करण्याचे देवाला बरे वाटले. कारण अनेक यहूदी लोक चमत्काराची चिन्हे विचारतात आणि ग्रीक लोक ज्ञानाचा शोध घेतात, परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण आणि ग्रीकांसाठी मूर्खपणा असा आहे. परंतु ज्यांना बोलावलेले आहे, अशा यहूदी व ग्रीक दोघांसही ख्रिस्त हा संदेश आहे तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असाही आहे. तथापि ज्यांस तुम्ही देवाचा “मूर्खपणा” म्हणता ते मानव प्राण्याच्या शहाणपणापेक्षा अधिक शहाणपणाचे आहे आणि ज्यांस तुम्ही देवाचा “दुर्बळपणा” समजता ते मानव प्राण्याच्या सशक्तपणाहून अधिक शक्तीशाली आहे. तर आता बंधूनो, देवाने तुम्हास केलेल्या पाचारणाबद्दल विचार करा. मानवी दृष्टिकोनातून तुमच्यातील पुष्कळसे शहाणे, सामर्थ्यशाली, उच्च कुळातले नव्हते, त्याऐवजी जगातले जे मूर्ख त्यांना देवाने निवडले, यासाठी की, शहाण्या मनुष्यास फजित करावे. कारण जगातील देवाने दीन, तुच्छ मानलेले, जे “नगण्य” त्यांना निवडले. यासाठी की जे “काहीतरी” आहेत त्यांना नगण्य करावे. यासाठी की कोणाही मनुष्याने देवासमोर बढाई मारू नये. कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे व तो देवाची देणगी म्हणून आपले ज्ञान, आपले नीतिमत्त्व, आपले पवित्रीकरण आणि आपली मुक्ती असा झाला आहे. यासाठी की नियमशास्त्रात असे लिहिले आहे, “जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी बाळगावा.”
1 करिं. 1 वाचा
ऐका 1 करिं. 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 करिं. 1:20-31
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ