1 इति. 7
7
इस्साखाराचे वंशज
उत्प. 46:13
1इस्साखारला चार पुत्र होते. त्यांची नावे अशी, तोला, पुवा, याशूब आणि शिम्रोन. 2उज्जी, रफाया, यरीएल, यहमय, इबसाम आणि शमुवेल हे तोलाचे पुत्र. आपापल्या पित्याच्या घराण्यात प्रमुख होते. ते आणि त्यांचे वंशज हे शूर लढवय्ये होते. त्यांची संख्या वाढून दावीदाच्या दिवसापर्यंत बावीस हजार सहाशें इतकी झाली. 3इज्रह्या हा उज्जीचा पुत्र. मीखाएल. ओबद्या. योएल आणि इश्शीया हे इज्रह्याचे पाच पुत्र. हे ही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते.
4त्यांच्या घराण्यात छत्तीस हजार सैनिक युध्दाला तयार होते असे त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले होते. कारण त्यांच्या स्त्रिया आणि पुत्र पुष्कळ होते. 5इस्साखाराच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून सत्याऐंशीं हजार लढवय्ये वंशावळ्यांनी मोजलेले होते.
बन्यामिनाचे वंशज
उत्प. 46:21
6बन्यामीनाला तीन पुत्र होते. बेला, बेकर आणि यदीएल. 7बेलाला पाच पुत्र होते. एस्बोन, उज्जी, उज्जियेल, यरीमोथ आणि ईरी हे ते पाच होत. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यात बावीस हजार चौतीस सैनिक होते.
8जमीरा, योवाश, अलियेजर, एल्योवेनय, अम्री, यरेमोथ, अबीया, अनाथोथ व अलेमेथ हे बेकेरचे पुत्र. 9आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले. वीस हजार दोनशे सैनिक होते. 10यदीएलचा पुत्र बिल्हान. बिल्हानचे पुत्र, यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर.
11यदीएलचे पुत्र हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे सतरा हजार दोनशे सैनिक युध्दाला तयार होते. 12शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा पुत्र हुशीम.
नफतालीचे वंशज
उत्प. 46:24
13यहसिएल, गूनी, येसर आणि शल्लूम हे नफतालीचे पुत्र. हे सर्व बिल्हेचे वंशज.
14मनश्शेचे पुत्र, अस्रियेल हा त्याची अरामी उपपत्नीपासून झाला. माखीर म्हणजे गिलादाचा पिता. 15हुप्पीम आणि शुप्पीम या लोकांपैकी एका स्त्रीशी माखीरने लग्न केले. त्या बहिणीचे नाव माका होते. मनश्शेच्या दुसऱ्या वंशजाचे नाव सलाफहाद होते. त्यास फक्त कन्याच होत्या. 16माखीरची पत्नी माका हिला पुत्र झाला. तिने त्याचे नाव पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेश. शेरेशचे पुत्र ऊलाम आणि रेकेम.
17ऊलामचा पुत्र बदान. हे झाले गिलादाचे वंशज. गिलाद हा माखीरचा पुत्र. माखीर मनश्शेचा पुत्र. 18माखीरची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर आणि महला हे पुत्र झाले. 19अह्यान, शेखेम, लिखी आणि अनीयाम हे शमीदचे पुत्र.
एफ्राइमाचे वंशज
20एफ्राईमाची वंशावळ पुढीलप्रमाणेः
एफ्राईमाचा पुत्र शूथेलाह.
शुथेलहचा पुत्र बेरेद.
बेरेदाचा पुत्र तहथ.
तहथाचा पुत्र एलादा.
एलादाचा पुत्र तहथ.
21तहथचा पुत्र जाबाद.
जाबादचा पुत्र शुथेलह.
गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले. कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरेढोरे चोरण्यास गेले होते. 22एजेर आणि एलद हे एफ्राईमाचे पुत्र होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले.
23मग एफ्राईमाचा पत्नीशी संबंध येऊन त्याची पत्नी गर्भवती राहिली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला. त्याने त्याचे नाव बरीया ठेवले. कारण त्याच्या घराण्यात शोकांतिका झाली होती. 24त्याची कन्या शेरा होती. हिने खालचे आणि वरचे बेथ-होरोन आणि उज्जन-शेरा ही बांधली.
25रेफह हा एफ्राईमाचा पुत्र.
रेफहचा पुत्र रेशेफ.
रेशेफचा पुत्र तेलह.
तेलहचा पुत्र तहन.
26तहनचा पुत्र लादान.
लादानचा पुत्र अम्मीहूद.
आम्मीहूदचा अलीशामा. 27त्याचा पुत्र नून आणि नूनचा पुत्र यहोशवा.
28एफ्राईमाच्या वंशजांची वतने आणि गावे पुढीलप्रमाणे त्या त्याठिकाणी ते राहत होते. बेथेल व त्याच्या जवळपासची गावे. पूर्वेला नारान, पश्चिमेस गेजेर आणि आसपासची खेडी, शखेम आणि त्याच्या आसपासची खेडी अगदी सरळ अय्या व त्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत. 29मनश्शेच्या सीमेला लागून असलेली बेथ-शान, तानख, मगिद्दो, दोर ही नगरे व त्यांच्या भोवतालचा प्रदेश एवढ्या भागात इस्राएलचा पुत्र योसेफ याचे वंशज राहत होते.
आशेराचे वंशज
उत्प. 46:17
30इम्ना, इश्वा, इश्वी, बरीया हे आशेरचे पुत्र. त्यांची बहीण सेराह. 31हेबेर, मलकीएल, हे बरीयाचे पुत्र. मालकीएलचा पुत्र बिर्जाविथ. 32यफलेट, शोमर, होथाम हे पुत्र आणि शूवा ही बहीण यांच्या हेबेर हा पिता होता.
33पासख, बिह्माल, अश्वथ हे यफलेटचे पुत्र. 34अही, राहागा. यहूबा व अराम हे शेमेराचे पुत्र. 35शेमेरचा भाऊ हेलेम. त्याचे पुत्र सोफह, इम्ना, शेलेश आणि आमाल.
36सोफहचे पुत्र सूहा, हर्नेफेर, शूवाल, बेरी व इम्ना, 37बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथ्रान, बैरा. 38यफुन्ने पिस्पा, अरा हे येथेरचे पुत्र.
39आरह, हन्निएल व रिस्या हे उल्लाचे पुत्र. 40हे सर्व आशेरचे वंशज. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले असे ते सव्वीस हजार लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते.
सध्या निवडलेले:
1 इति. 7: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.