YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इति. 11:4-9

1 इति. 11:4-9 IRVMAR

दावीद व सर्व इस्राएल लोक यरूशलेम म्हणजे यबूस याठिकाणी गेले. आता त्या देशाचे रहिवासी यबूसी लोक तेथे राहत होते. यबूसचा रहिवासी दावीदाला म्हणाला, “तू येथे येणार नाहीस.” पण तरीही दावीदाने सियोनचा किल्ला घेतला. हेच दावीदाचे नगर आहे. दावीद म्हणाला, “जो कोणी यबूसी लोकांवर प्रथम हल्ला करील तोच माझा सेनापती होईल.” सरुवेचा पुत्र यवाब याने प्रथम हल्ला केला म्हणून त्यास सेनापती करण्यात आले. मग दावीदाने किल्ल्यातच आपला मुक्काम केला म्हणून त्याचे नाव दावीद नगर पडले. त्याने त्या नगराला चोहीकडून म्हणजे मिल्लोपासून ते सभोवार मजबूत कोट बांधला. नगराचा राहिलेला भाग यवाबाने मजबूत केला. दावीद अधिकाधिक महान होत गेला कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्याबरोबर होता.