YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इति. 1:43-54

1 इति. 1:43-54 IRVMAR

इस्राएलामध्ये या राजांनी राज्य केले त्याच्या कितीतरी आधी अदोम येथे हे राजे होते. त्यांची नावे बौराचा पुत्र बेला, बेलाच्या नगराचे नाव दीन्हाबा. बेलाच्या निधनानंतर जेरहचा पुत्र योबाब राजा झाला. योबाब बस्रा येथील होता. योबाबाच्या निधनानंतर त्याच्या जागी हूशाम राजा झाला. हा तेमानी देशातील होता. हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा पुत्र हदाद याने राज्य केले. त्याने मवाबाच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते. हदाद मरण पावल्यावर साम्ला राजा झाला. हा मास्रेका येथील होता. साम्ला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा नदीवरल्या रहोबोथाचा होता. शौल मरण पावल्यावर अकबोराचा पुत्र बाल-हानान राजा झाला. बाल-हानान मरण पावल्यावर हदाद राजा झाला. त्याच्या मुख्य नगराचे नाव पाई असे होते. हदादच्या पत्नीचे नाव महेटाबेल. ही मात्रेद हिची कन्या. मात्रेद मेजाहाबची कन्या. पुढे हदाद मरण पावल्यानंतर अदोमाचे सरदार तिम्ना, आल्वा, यतेथ, अहलीबामा, एला, पीनोन, कनाज, तेमान मिब्सार, माग्दीएल, ईराम, हे अदोमाचे नेते झाले.