YouVersion लोगो
सर्च आयकॉन

जखर्‍या 9:9-13

जखर्‍या 9:9-13 MARVBSI

सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. एफ्राइमातले रथ, यरुशलेमेतले घोडे मी नष्ट करीन; युद्धधनुष्य तोडून टाकण्यात येईल, तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल; त्याचे आधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून ते पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल. तुझ्याविषयी म्हणशील तर तुझ्याबरोबर केलेल्या कराराच्या रक्तसिंचनामुळे मी तुझ्या बंदिवानांना निर्जल गर्तेतून मुक्त करीन. आशा धरून राहिलेले बंदिवानहो, दुर्गाकडे परत या; आज मी हे जाहीर करतो की, मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन. मी यहूदारूप धनुष्य वाकवून एफ्राइमरूप बाण लावला आहे; हे सीयोने, मी तुझ्या पुत्रांना चेतवीन; हे ग्रीसा,2 त्यांना तुझ्या पुत्रांविरुद्ध चेतवीन; वीराच्या खड्गाप्रमाणे तुला करीन.