YouVersion लोगो
सर्च आयकॉन

जखर्‍या 14:16-21

जखर्‍या 14:16-21 MARVBSI

आणखी असे होईल की यरुशलेमेवर चढाई करून आलेल्या राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेले सर्व, राजाधिराज सेनाधीश परमेश्वर ह्याचे भजनपूजन करण्यासाठी व मंडपाचा सण पाळण्यासाठी प्रतिवर्षी यरुशलेमेस वर जातील. आणखी असे होईल की, पृथ्वीवरील घराण्यांपैकी जे राजाधिराज सेनाधीश परमेश्वर ह्याचे भजनपूजन करण्यास यरुशलेमेस जाणार नाहीत, त्यांच्यावर पर्जन्यवृष्टी होणार नाही. तसेच मिसराचे घराणे वर चढून गेले नाही, तर त्यांच्यावरही पर्जन्यवृष्टी होणार नाही; जी राष्ट्रे मंडपांचा सण पाळण्यासाठी वर चढून जाणार नाहीत त्या सर्व राष्ट्रांवर परमेश्वर जी मरी पाठवणार ती ह्यांच्यावरही येईल. मिसरास व मंडपांचा सण पाळण्यास वर चढून जाणार्‍या सर्व राष्ट्रांना हीच शिक्षा होईल. त्या दिवशी घोड्यांच्या घंटांवर परमेश्वराला पवित्र अशी अक्षरे असतील आणि परमेश्वराच्या मंदिरातली बहुगुणी वेदीपुढल्या यज्ञांच्या कटोर्‍यांसारखी होतील. यरुशलेमेतील व यहूदातील प्रत्येक बहुगुणे सेनाधीश परमेश्वराला पवित्र होईल; व सर्व यज्ञकर्ते येऊन ती घेतील व त्यांत अन्न शिजवतील; त्या दिवसांपासून पुढे सेनाधीश परमेश्वराच्या मंदिरात कोणी व्यापारी1 असणार नाही.